शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विकणाऱ्या आरोपीला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 7:36 PM

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन विक्री करणाऱ्या एका आरोपीला सहायक सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांच्या न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि १५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देमध्य प्रदेशात विकून लावून दिले होते लग्न

आॅनलाईन लोकमतनागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन विक्री करणाऱ्या एका आरोपीला सहायक सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांच्या न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि १५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.अजय ऊर्फ विलियम अ‍ॅन्थोनी फ्रान्सिस (३०) रा. नारी रोड म्हाडा कॉलनी, असे आरोपीचे नाव आहे. या खटल्यात श्रीपाल देवराम सूर्यवंशी (२५) रा. नवेली गाव , जिल्हा रतलाम (मध्य प्रदेश) हाही आरोपी असून तो फरार आहे. त्याला अटक होताच त्याच्याविरुद्ध वेगळा खटला चालविण्यात येणार आहे.प्रकरण असे की, पीडित मुलीने आठव्या वर्गापासून शाळा सोडली होती. ती कॅटरिंगच्या कामाला जाऊ लागली होती. ४ जून २०१६ रोजी कॅटरिंगच्या कामावरील अजय फ्रान्सिस याने फूस लावून या मुलीला पळवून नेले होते. तिची श्रीपाल सूर्यवंशी याच्याकडे विक्री करून त्याच्याशी लग्न लावून दिले होते.पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी भादंविच्या ३६३, ३६६, ३४२, ३७३, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून ११ जून २०१६ रोजी अजय फ्रान्सिस याला अटक केली होती. प्रत्यक्ष मुलीची खरेदी करणारा आरोपी श्रीपाल हा आढळून आला नाही. त्याला फरार दर्शवण्यात आले. महिला सहायक फौजदार निर्मला बडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपी अजय फ्रान्सिस याला भादंविच्या ३६३ कलमांतर्गत एक वर्ष सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, ३६६ कलमांतर्गत एक वर्ष सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, ३४२ कलमांतर्गत सहा महिने कारावास आणि भादंविच्या ३७३ कलमांतर्गत एक वर्ष कारावास, ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील अजय माहूरकर, आरोपीच्या वतीने अ‍ॅड. ममता जयसिंघानी यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल फय्याज, रविकिरण भास्करवार आणि मुकुंद जयस्वाल यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.

 

 

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर