रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:13 IST2021-08-28T04:13:09+5:302021-08-28T04:13:09+5:30

नागपूर : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीकडून १.९७ लाख रुपये किमतीचे १२ मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले आहेत. ...

Accused arrested for stealing train passenger's mobile | रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीस अटक

रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीकडून १.९७ लाख रुपये किमतीचे १२ मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान आरोपीने आठ मोबाईल पारडी येथे राहणाऱ्या गर्लफ्रेंडच्या घरी ठेवल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी त्याच्या पारडी येथील गर्लफ्रेंडच्या घरून आठ मोबाईल जप्त केले आहेत.

नसीब अजाबराव वाघमारे (२२) रा. मोहखेडी ता. मौदा जि. नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे रेल्वे प्रवाशांचे चोरी केलेले मोबाईल असल्याची गुप्त माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलीस निरीक्षक मनिषा काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भलावी, डीबी पथकातील शैलेश उके, योगेश घुरडे, प्रवीण खवसे आदींनी मोहखेडी येथून आरोपीला अटक केली. त्याच्याजवळ चोरी केलेले ८० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल पोलिसांनी जप्त केले. आरोपीची एक दिवसाची पोलीस कोठडी घेतली असता आणखी आठ मोबाईल आपल्या पारडी येथील गर्लफ्रेंडच्या घरात ठेवल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरातून आठ मोबाईल जप्त केले. तपास सहायक उपनिरीक्षक राजेश झुरमुरे करीत आहेत.

...........

Web Title: Accused arrested for stealing train passenger's mobile