नागपुरात  मांढूळ जातीच्या सापासह आरोपीला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:19 IST2020-04-26T00:17:44+5:302020-04-26T00:19:34+5:30

बुटीबोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बुटीबोरी (पश्चिम) उपवन परिक्षेत्राच्या जुनापानी बीटामध्ये वन कर्मचाऱ्यांनी एका आरोपीला मांढूळ जातीच्या सापासह अटक केली.

Accused arrested in Nagpur with snake | नागपुरात  मांढूळ जातीच्या सापासह आरोपीला अटक 

नागपुरात  मांढूळ जातीच्या सापासह आरोपीला अटक 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुटीबोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बुटीबोरी (पश्चिम) उपवन परिक्षेत्राच्या जुनापानी बीटामध्ये वन कर्मचाऱ्यांनी एका आरोपीला मांढूळ जातीच्या सापासह अटक केली. नाजीम शेख असे या आरोपीचे नाव आहे.
शुक्रवारी दुपारी या वनक्षेत्रामध्ये वन कर्मचारी गस्त घालत असताना आरोपी नाजीम शेख स्वत:जवळ साप घेऊन फिरताना दिसला. कर्मचाºयांनी त्याची चौकशी करून साप सोबत घेऊन फिरण्याचे कारण विचारले. मात्र त्याने टाळाटाळ सुरू केली. त्याच्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून हिंगणा येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

Web Title: Accused arrested in Nagpur with snake