शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

नागपुरात खड्ड्यांमुळे होताहेत वाहनचालकांचे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 9:26 PM

उपराजधानीतील रस्त्यांवर अलीकडच्या काळात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालक उसळून खाली पडत आहेत. वाहन चालकांच्या जीवितासाठी धोका ठरत असलेल्या या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांना रुग्णालयातही पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे वाहनांचे टायर आणि शॉकअप खराब होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. शहरात सुरू असलेल्या विकासकामांसाठी मोठमोठ्या मशिन, मालवाहक वाहनांचे आवागमन आणि जागोजागी खोदकाम यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

ठळक मुद्देवाहनांचेही होत आहे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील रस्त्यांवर अलीकडच्या काळात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालक उसळून खाली पडत आहेत. वाहन चालकांच्या जीवितासाठी धोका ठरत असलेल्या या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांना रुग्णालयातही पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे वाहनांचे टायर आणि शॉकअप खराब होण्याच्या तक्रारी वाढत आहेत.शहरात सुरू असलेल्या विकासकामांसाठी मोठमोठ्या मशिन, मालवाहक वाहनांचे आवागमन आणि जागोजागी खोदकाम यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री १० वाजता मेडिकल चौक ते बैद्यनाथ चौकाकडे दुचाकीने येत असलेली मेडिकलची विद्यार्थिनी खाली पडली. रस्त्यावर टायरच्या आकाराचा नालीसारखा खड्डा असल्यामुळे हा अपघात झाला. असाच खड्डा मानकापूर स्टेडियमच्या आधी गेटच्या समोर आहे. हा खड्डा दुचाकी वाहनांच्या अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहे. हा रस्ता देशात हाय वे तयार करणाऱ्या ‘एनएचएआय’ने तयार केला आहे. डांबराच्या या रस्त्यावर पॅचवर्क सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले असून ते ओले असताना वाहने त्यावरून गेल्यामुळे येथे छोटी नाली तयार झाली आहे. ‘एनएचएआय’ने असे निकृष्ट दर्जाचे काम मानकापूर अंडरब्रीजमध्येही केले असून तेथील सुरुवातीचा भाग जमिनीत जाऊन खड्डा पडला आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार जीवघेण्या खड्ड्यांची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने सांगितल्यानुसार बैद्यनाथ चौकात रविवारी रात्री ९ वाजता दुचाकीने आपल्या वडिलांसोबत जात असलेल्या एक मुलगी खड्ड्यामुळे जोरात उसळली. यात ती मोठ्या अपघातापासून बालंबाल बचावली. येथे रस्त्याच्या मधोमध नाली खोदली असून त्यावर पाटीही टाकण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी दुचाकी खड्ड्यावरून गेल्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. शहरात पारडी, अमरावती रोड, फ्रेंड्स कॉलनी मार्ग, पोलीस लाईन तलाव ते अवस्थी चौक मार्ग, मंगळवारी बाजार रोड, कामठी रोड, वर्धा रोड, सदर मेन रोड या भागातही हीच अवस्था आहे. रस्त्यांची ही बिकट अवस्था शहरात सर्वत्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत असून या रस्त्यांची डागडुजी होताना मात्र दिसत नाही.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर