दुचाकीचालक तरुणाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:12 IST2021-09-05T04:12:47+5:302021-09-05T04:12:47+5:30

वेलतूर : वेगात असलेल्या माेटरसायकलला कुत्रा आडवा आला आणि चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ताे वाहनासह खाली काेसळला. यात गंभीर ...

Accidental death of a young cyclist | दुचाकीचालक तरुणाचा अपघाती मृत्यू

दुचाकीचालक तरुणाचा अपघाती मृत्यू

वेलतूर : वेगात असलेल्या माेटरसायकलला कुत्रा आडवा आला आणि चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ताे वाहनासह खाली काेसळला. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेथली गावाजवळ नुकतीच घडली.

अनिल संपतराव वघारे (२८, रा. भिसी, जिल्हा चंद्रपूर) असे मृताचे नाव आहे. अनिल माेटरसायकलने वेलतूरहून भिसीला जात हाेता. ताे बाेथली (ता. कुही) गावाजवळ पाेहाेचताच कुत्रा त्याच्या माेटरसायकलला आडवा आला. माेटरसायकल वेगात असल्याने त्याचा ताबा सुटला व ताे खाली काेसळला. यात त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला लगेच वेलतूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक नितेश डाेर्लीकर करीत आहेत.

Web Title: Accidental death of a young cyclist