उपचारासाठी निघालेल्या महिलेचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST2021-06-02T04:07:45+5:302021-06-02T04:07:45+5:30

कारचालकाने मारली धडक : वर्धा मार्गावर अपघात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपचारासाठी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जात असलेल्या एका दुचाकीस्वार ...

Accidental death of a woman who went for treatment | उपचारासाठी निघालेल्या महिलेचा अपघाती मृत्यू

उपचारासाठी निघालेल्या महिलेचा अपघाती मृत्यू

कारचालकाने मारली धडक : वर्धा मार्गावर अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपचारासाठी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जात असलेल्या एका दुचाकीस्वार महिलेला भरधाव कार चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे तिचा करुण अंत झाला. स्मिता किरण संगतराव (वय ५७) असे मृत महिलेचे नाव आहे.

स्मिता मनीषनगरातील शिल्पा सोसायटीत राहत होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना कर्करोग होता. त्या नेहमी जामठ्यातील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये किमोथेरपी घेण्यासाठी जायच्या. मंगळवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास नेहमीप्रमाणे त्यांच्या दुचाकीने उपचार घेण्यासाठी जात असताना वर्धा-नागपूर मार्गावर नारायणा विद्यालयासमोर त्यांना एका कार चालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाला. माहिती कळताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृत स्मिता यांच्या भगिनी सरिता अलोणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

---

Web Title: Accidental death of a woman who went for treatment