गोंदियातील तिघांचा मौद्यात अपघाती मृत्यू

By Admin | Updated: July 23, 2016 03:24 IST2016-07-23T03:24:37+5:302016-07-23T03:24:37+5:30

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटरसायकल दुभाजकावर आदळली. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही खाली कोसळले.

Accidental Death in Three Deaths of Gondiya | गोंदियातील तिघांचा मौद्यात अपघाती मृत्यू

गोंदियातील तिघांचा मौद्यात अपघाती मृत्यू

दुचाकी दुभाजकावर आदळली : सावळी शिवारातील घटना
मौदा : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटरसायकल दुभाजकावर आदळली. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही खाली कोसळले. त्यातच भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. तिघेही गोंदिया येथील रहिवासी आहेत. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - भंडारा महामार्गावरील सावळी (फाटा) शिवारात गुरुवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली.
दिनेश ख्रिश्चंद्र गौतम (२३, रा. सूर्यटोला, गोंदिया), आकाश धनलाल गौतम (२४, रा. सूर्यटोला, गोंदिया) व अमित पवन दाणी (२३, रा. गोशाला वॉर्ड, गोंदिया) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
हे तिघेही मोटरसायकलने गोंदियाहून नागपूरला जात होते. ते सावळी (फाटा) शिवारात पोहोचताच चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव मोटरसायकल दुभाजकावर आदळली. त्यामुळे तिघेही खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत रोडवर पडून असल्याने तसेच त्यांना वेळीच कुणीही मदत न केल्याने मागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. त्यात तिघांचाही मृत्यू झाला.
अपघातानंतर बराच वेळाने या घटनेची माहिती पोलिसंना मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तिघांचाही मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मोटरसायकल निष्काळजीपणाने चालविल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७२, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे व मेश्राम करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Accidental Death in Three Deaths of Gondiya