वीज कामगाराचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST2021-05-20T04:08:33+5:302021-05-20T04:08:33+5:30

वानाडाेंगरी : विद्युत दुरुस्ती करीत असताना खाली पडून गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना हिंगणा ...

Accidental death of a power worker | वीज कामगाराचा अपघाती मृत्यू

वीज कामगाराचा अपघाती मृत्यू

वानाडाेंगरी : विद्युत दुरुस्ती करीत असताना खाली पडून गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना हिंगणा तालुक्यातील कान्हाेलीबारा सबस्टेशनअंतर्गत मंगळवारी (दि.१८) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

अभय दिवाकर निकाेडे (२४, रा. मेंढेपार, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) असे मृत कामगाराचे नाव असून, ताे कान्हाेलीबारा सबस्टेशन येथे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत हाेता. विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक ताे तारेवर पडला. त्याला खाली उतरविण्यासाठी अन्य कामगार गेला असता, अभय खांबावरून खाली पडला. यात त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. लगेच त्याला कान्हाेलीबारा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. हिंगणा पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी हिंगणा पाेलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Accidental death of a power worker