शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सालई येथील मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक, नवेगाव शिवारातील घटना

By सुनील चरपे | Updated: October 15, 2022 20:13 IST

भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक/हिवराबाजार : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ते सालई (ता. रामटेक) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकपदी कार्यरत हाेते. ही घटना रामटेक-हिवराबाजार मार्गावरील नवेगाव (पुसदा पुनर्वसन) शिवारात शनिवारी (दि. १५) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

विश्वनाथ कुंभलकर (४०, रा. हिवराबाजार, ता. रामटेक) असे मृताचे नाव आहे. ते सालई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकपदी कार्यरत हाेते. शिवाय, तीन महिन्यांपासून ते रामटेक शहरात राहायचे. शनिवारी सकाळची शाळा असल्याने ते नेहमीप्रमाणे एमएच-४०/एस-२१५८ क्रमांकाच्या माेटरसायकलने रामटेकहून हिवराबाजार मार्गे सालई येथे जायला निघाले. नवेगाव (पुसदा पुनर्वसन) शिवारात विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमएच-३१/सीडी-५७५६ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली.

यात डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात हाेताच ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून विश्वनाथ यांचा मृतदेह देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला. पाेलिसांनी नाकाबंदी करून अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक पकडला. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी ट्रकचालक महेंद्र माधोराव भलावी रा. नवेगाव (चिचदा), ता. रामटेक याच्या विराेधात भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा केला असून, तपास ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांच्या मार्गदर्शनात सतीश नागपुरे करीत आहेत.

वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच...

विश्वनाथ कुंभलकर यांना शाश्वत (६) व पार्थ (४) ही दाेन मुले आहेत. पार्थचा शुक्रवारी (दि. १४) वाढदिवस हाेता. काही कारणास्तव त्यांनी पार्थचा वाढदिवस शुक्रवार ऐवजी शनिवारी (दि. १५) सायंकाळी साजरा करणार हाेते. मात्र, त्यापूर्वी काळाने त्यांच्यावर झडप घातली. ते ट्रकच्या समाेरच्या चााकाखाली आल्याने त्यांच्या डाेक्याचा चेंदामेंदा झाला हाेता. ताे ट्रक पुसदा पुनर्वसन शिवारातील माया ब्रिक्स असून, विटा घेऊन जात हाेता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर