लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इयत्ता बारावीचा निकाल आटोपून सहायक शिक्षकासोबत घरी परत जात असलेल्या मुख्याध्यापकाची मोटरसायकल स्लीप झाली आणि ते खाली कोसळले. त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये नेताना मुख्याध्यापकाचा वाटेतच मृत्यू झाला. ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव परिसरात बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली.प्रशांत संतोषराव उमाठे (४९, रा. काटोल) असे मृताचे नाव आहे. ते मोवाड येथील नगर परिषद हायस्कूलमध्ये मुख्याध्यापकपदी कार्यरत होते. बारावीचा निकाल आटोपून ते सहायक शिक्षक चंद्रकांत खोडे यांच्यासोबत एमएच-४०/बीडी-२३७७ क्रमांकाच्या मोटरसायकलने काटोलला घरी परत जात होते. दरम्यान, सावरगाव परिसरात स्टॅण्ड रोडला लागल्याने त्यांचा ताबा सुटला व मोटरसायकल स्लीप झाली. त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना लगेच काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, प्रशांत उमाठे यांचा वाटेतच मृत्यू झाला. चंद्रकांत खोडे यांच्यावर लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
निकाल आटोपून परतणाऱ्या मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:07 IST
इयत्ता बारावीचा निकाल आटोपून सहायक शिक्षकासोबत घरी परत जात असलेल्या मुख्याध्यापकाची मोटरसायकल स्लीप झाली आणि ते खाली कोसळले. त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये नेताना मुख्याध्यापकाचा वाटेतच मृत्यू झाला. ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव परिसरात बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली.
निकाल आटोपून परतणाऱ्या मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू
ठळक मुद्देमोटरसायकल स्लीप : नागपूरनजीकच्या सावरगाव परिसरातील घटना