अभियंत्याचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:34+5:302021-06-02T04:08:34+5:30
रामटेक : भरधाव कारने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अभियंत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रामटेक ...

अभियंत्याचा अपघाती मृत्यू
रामटेक : भरधाव कारने माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अभियंत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतलवाडी परिसरात शनिवारी (दि. २९) घडली.
हंसराज नाईक, रा. स्वामी विवेकानंद वाॅर्ड, रामटेक असे मृताचे नाव आहे. ते अभियंता हाेते. काम आटाेपून ते शनिवारी एमएच-४०/क्यू-४५५८ क्रमांकाच्या माेटरसायकलने रामटेककडे येत हाेते. त्यातच शीतलवाडी परिसरात विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमएच-४०/बीई-६१३६ क्रमांकाच्या कारने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात त्यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आली. तिथे मंगळवारी (दि. १) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.