दाेघांचा अपघाती मृत्यू, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:25+5:302021-04-05T04:08:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : काम आटाेपून घरी परत येत असलेल्या तरुणांच्या दुचाकीचा वेग गतिराेधकाजवळ कमी हाेताच मागून वेगात ...

दाेघांचा अपघाती मृत्यू, एक जखमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : काम आटाेपून घरी परत येत असलेल्या तरुणांच्या दुचाकीचा वेग गतिराेधकाजवळ कमी हाेताच मागून वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दाेघांचाही मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. तिघेही कामगार म्हणून काम करायचे आणि कुटुंबाला हातभार लावायचे. ही घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आठवा मैल परिसरात शनिवारी (दि. ३) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
शुभम रमेश नवाडे (२२, रा. मोहाडे ले-आऊट आठवा मैल, वाडी) व फिरोज सलीम शेख (२३, रा. तिजारे ले-आऊट, आठवा मैल, वाडी) अशी मृत तरुणांची नावे असून, सुमीत सुरेश वानखेडे (२८, रा. मोहाडे ले-आऊट, आठवा मैल, वाडी) असे जखमीचे नाव आहे. शुभम, फिराेज व सुमीत नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गाेंडखैरी (ता. कळमेश्वर) परिसरातील ब्ल्यू स्टार कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचे. शनिवार रात्री काम आटाेपल्यानंतर तिघेही नेहमीप्रमाणे एमएच-४०/एक्स-३८७० क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे यायला निघाले.
सुमीत दुचाकी चालवित हाेता, तर शुभम मध्ये व फिराेज मागे बसला हाेता. सुमीतने भरतनगर परिसरातील गतिराेधकाजवळ दुचाकीचा वेग कमी केला. त्याचवेळी मागून वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली आणि ताे ट्रक लगेच निघून गेला. यात तिघेही दुचाकीसह खाली काेसळल्याने शुभम व फिराेजच्या डाेक्याला, तर सुमीतच्या कपाळ व हाताला गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. ताेपर्यंत शुभमचा घटनास्थळीच मृत्यू झाला हाेता. पाेलिसांनी फिराेज व सुमीतला उपचारासाठी, तर शुभमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेयाे रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, तिथे फिराेजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी सुमितच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भादंवि ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात वाडी पाेलीस करीत आहेत.