शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात चार वर्षांत २७८ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 20:27 IST

गेल्या चार वर्षात नागपूर जिल्ह्यात २७८ विद्यार्थ्यांचा मत्यू झाला असून, या योजनेंतर्गत २ कोटी ३० लाख रुपयांची भरपाई विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसानुग्रह अनुदान योजनेंतर्गत दोन कोटीची भरपाई : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अपघातामुळे विद्यार्थ्यांना पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्यासाठी राज्य सरकार राजीव गांधी विद्यार्थीअपघात सानुग्रह योजना राबवीत आहे. गेल्या चार वर्षात नागपूर जिल्ह्यात २७८ विद्यार्थ्यांचा मत्यू झाला असून, या योजनेंतर्गत २ कोटी ३० लाख रुपयांची भरपाई विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आली आहे.वर्ग १ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येते. पूर्वी ही योजना विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत होती. परंतु विमा कंपन्यांच्या वर्तनाबद्दल शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विमा कंपन्या विविध कारणे सांगून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत होती. विद्यार्थ्यांच्या अपघाताचे दावे लवकर निकाली लागत नसल्यामुळे, विमा कंपन्यांमार्फत योजना बंद करून त्याऐवजी सानुग्रह अनुदान योजना २०१२-१३ पासून राबविण्यात आली. संर्पदंश, विषबाधा, विजेचा शॉक, अपघात आदीमध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याला ७५,००० रुपये भरपाई देण्यात येते. अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास ५०,००० व एक डोळा एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रुपये भरपाई देण्यात येते. योजनेची भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी माध्यमिक हे सदस्य आहेत, तर शिक्षणाधिकारी प्राथमिक हे सदस्य सचिव आहेत. विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व शाळेच्या मुख्याध्यापकांची आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षात २७८ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे आले आहेत. त्यांच्या नुकसान भरपाईपोटी २ कोटी ३० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. वर्षनिहाय नुकसान भरपाईवर्ष                विद्यार्थी संख्या           नुकसान भरपाई२०१४-१५     ६५                          ४४,२५,०००२०१५-१६     ६२                          ४६,५०,०००२०१७-१८     ४८                         ३६,००,०००२०१८-१९     १०३                       ७७,२५,०००

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीDeathमृत्यू