शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सदर उड्डाणपुलावर अपघात, दोन मित्रांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 10:41 IST

रात्री वाकीला फिरायला जाण्याचा अतिउत्साह भोवला

नागपूर : सदर उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असताना आणखी एका अपघातात दोघांचा बळी गेला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोन मित्रांना अज्ञात वाहनाने धडक दिली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. चौकशीदरम्यान दोन्ही तरुण अतिवेगाने दुचाकी चालवत रात्री वाकी येथे फिरायला निघाल्याची बाब समोर आली. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मूळचा यवतमाळमधील उमरखेड येथील ज्ञानेश्वर रमेश वासमवार (२१, सोमवारी क्वॉर्टर) व नचिकेत सूरज राऊत (२४, राणी भोसलेनगर, सक्करदरा), असे मृतक मित्रांचे नाव आहे. मंगळवारी रात्री पाच मित्र एकत्रित बसले व त्यांनी मद्य प्राशन केले. त्यानंतर त्यांनी मोमीनपुरा येथे पोहे खाल्ले व दीड वाजेच्या सुमारास पाचही जण दोन दुचाकींनी फिरायला निघाले.

कोराडी तलावाजवळ पोहोचल्यावर त्यांनी परत जाण्याचे ठरविले व ते उड्डाणपुलावरून ताजबागच्या दिशेने निघाले. त्यांच्यासोबत आणखी एका दुचाकीवर त्यांचे मित्र हेमंत मांझी (२१, छोटा ताजबाग), मयूर श्रीवास व अभिषेक लोखंडे हेदेखील होते. उड्डाणपुलावर पागलखाना चौकाजवळ आले असता नचिकेतने वेगाने दुचाकी चालविली व तो हेमंतच्या दुचाकीच्या समोर निघून गेला. कल्पना टॉकीजच्या चौकातून सदर उड्डाणपुलावर चढत असताना अज्ञात वाहनाने नचिकेतच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मानकापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर