शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारा; डॉ. सुरभी मित्रानी उलगडली समलैंगिकतेमागील कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 18:11 IST

रूबरू ह्यूमन लायब्ररीत डॉ. मित्रा यांनी समलैगिकतेबाबत शास्त्रीय माहितीसह सामाजिक व मानसिक दृष्टिकोन यावर माहिती दिली.

नागपूर : स्वत:ची अभिवृत्ती जाणून घेऊन आपण जसे आहात तसे स्वत:ला स्वीकारा तरच आनंदी आयुष्य जगता येईल, असे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुरभी मित्रा यांनी केले. विशेष आयुष्य जगलेल्या व्यक्तींच्या आयुष्याची कहाणी त्यांच्याकडून थेट ऐकण्याची संधी देणाऱ्या 'मेरी कहानी, मेरी जुबानी' या रूबरू ह्यूमन लायब्ररीच्या उपक्रमात त्या पुस्तक म्हणून बोलत होत्या.

डॉ. वसंतराव वांकर भवनात आयोजित कार्यक्रमास श्रोत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी  केली होती. व्यवसायाने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या आणि समलैंगिक समूहाच्या प्रतिनिधी म्हणून डॉक्टर मित्रा यांनी वैयक्तिक अनुभव सांगण्याबरोबरच एलजीबीटीक्यू आणि अन्य संरचनेतील शास्त्रीय माहिती सामाजिक व मानसिक दृष्टिकोनांतून स्पष्ट केली. मागील वर्षी झालेला डॉक्टर सुरभी मित्रा व त्यांच्या  जीवनसाथी पारोमिता यांचा साखरपुडा हा संपूर्ण देशभरात गाजला होता. याबाबतही डॉ. मित्रा यांनी अनुभव कथन केले. 

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात डॉ. सुरभी यांनी समलिंगी व्यक्तींच्या मनोशारीर जडणघडणीवर शास्त्रीय पद्धतीने प्रकाश टाकला. एखादी व्यक्ती तृतीयपंथी का असते, एखादी गे वा लेस्बियन का असते, याची कारणे त्यांनी विशद केली. तर, दुसऱ्या सत्रात त्यांनी आपल्या व्यक्तीगत आयुष्यातील वाटचालीबाबतचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. यात नवव्या वर्गात असताना आपल्याला जी जाणीव झाली, तिचा पुढचा प्रवास कसकसा होत गेला.. त्यातील अडथळे, अडचणी या सर्वांची माहिती दिली. 

समलैंगिकता म्हणजे काय?

स्त्री-पुरुषांमधील समलैंगिकता व अन्य एलजीबीटी संरचनेतील अन्य प्रकार हे नैसर्गिक असतात. प्रत्येक व्यक्तीची लैंगिक ओढ ही भिन्न भिन्न असू शकते. ही भिन्नता समाजाने समजावून घेतली पाहिजे व स्वीकारली पाहिजे. समलिंगी ओढीचे दमन करणे मग ते सामाजिक दडपणे, कौटुंबिक असहकार्य, विविध वैद्यकीय व मानसिक प्रयोग या कशाही करिता असले तरी ते क्रूर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 

अशा दडपणामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य त्याच्या मनाविरुद्ध तर असतेच परंतु त्याच्या जीवनात येणाऱ्या विविध नाते सबंधानाही नाहक त्रास सोसावा लागतो. यासाठी भिन्न लैंगिक अभिव्यक्तीच्या पाल्यास सर्वप्रथम पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. कुठलेही फॅड अथवा  फॅशन म्हणून व्यक्ती एलजीबीटीक्यू आदी समूहात जात नसतो. तर ती त्याला निसगार्ने व त्याच्या अंत:प्रवाहाने दिलेली हाक असते हे समजून त्यांच्या पाठीशी राहणे हे पालकांबरोबर समाजाचेही कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या. 

स्त्री अथवा पुरुष याशिवाय स्वत:ची अन्य ओळख सांगणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधताना त्याला अपेक्षित संबोधन करावे. किंबहुना त्यास कुठले संबोधन आवडेल याची विचारणा करून त्यांच्याशी संवाद साधणे ही शिष्टाचाराला धरून असल्याचे त्या म्हणाल्या. भिन्न अभिवृत्तीच्या व्यक्तिमत्त्वांना माणूस म्हणून स्वीकारणे, सामाजिक दडपणामुळे कुटुंबालाही अवघड जाते. अशावेळी ही तात्पुरती विचार धारणा आहे यातून बाहेर पडण्याचे तांत्रिक व मांत्रिक उपाय आहेत असे म्हणून त्या व्यक्तीला समजावणे- धमकावणे, प्रसंगी मारहाण करणे शारीरिक व मानसिक ताण देणे अशा बाबी टाळणे महत्त्वाचे आहे.

अडचणी आणि आव्हान

लैंगिक अभिवृत्ति सोडता एलजीबीटीक्यू आणि अन्य समूहातील व्यक्ती सामान्यच आयुष्य जगत असते. ते करियर करतात, स्वत:चे कुटुंब जबाबदारीने सांभाळतात. सामाजिक आणि  व्यक्तिगत जीवनातील प्रत्येक आव्हानाला इतरांसारखेच सामोरे जातात, हे समजून घेण्याची गरज आहे. अशा व्यक्तिमत्वाना विसंगती समजून त्यांना समाजाच्या बाहेर ठेवणे अयोग्य असल्याचेही मत डॉ. सुरभी मित्रा यांनी व्यक्त केले. 

तसेही समाजमान्य नसलेले आयुष्य जगणारी ही माणसे अनेक संकटांना पावलोपावली सामोरे जातच असतात याबाबत सांगताना डॉक्टर मित्रा यांनी स्वत:चेच उदाहरण दिले. त्या म्हणतात, समाजातील उच्चशिक्षित व्यावसायिक व प्रतिष्ठित कुटुंबातील घटक म्हणून मी समलैंगिक विवाहाचा घेतलेला निर्णय माझ्या कुटुंबीयांनी, मित्रांनी व व्यावसायिकांनी स्वीकारला असला तरी कायद्याच्या चौकटीत आम्हाला अनेक अडचणी आहेत. जसे आम्हाला विवाहाचे कायदेशीर प्रमाणपत्र मिळणे अवघड आहे. जीवनसाथी म्हणून विविध शासकीय नोंदी करणे यासही ही अद्याप कायदेशीररीत्या मान्य नाही. मूल जन्माला घालण्याचा पर्याय जरी आम्ही स्वीकारला तरी आमच्या अपत्याला समाजात अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल हेसुद्धा आमच्यासाठी त्रासदायकच आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

अभिवृत्तीसह जगण्याचे स्वातंत्र्य

सर्वसामान्यांसारखे माणूस म्हणून जन्माला आलो असलो तरी स्वत:च्या अभिवृत्तीसह जगण्याचे स्वातंत्र्य आम्हा एलजीबीटीक्यू आणि अन्य समुदायास नाही. ही एकविसाव्या शतकातही खेदाची बाब आहे. यासाठी संवेदनशील समाजाने या समूहाचे एलाँँय म्हणजेच सहयोगी अशी भूमिका पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. याकार्यक्रमाचे संचालन रूबरूच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी केले तर आभार अ‍ॅड. मयुरी देशमुख यांनी केले. कार्यक्रमास अनेक समुपदेशक, डॉक्टर्स, वकील व्यावसायिकांसह नागपुरातील अभ्यासू मंडळी विशेषत्वाने उपस्थित होती.

टॅग्स :SocialसामाजिकLGBTएलजीबीटीnagpurनागपूर