'चल तुझ्या वडिलांना शोधू..' असे म्हणून नेले मित्राच्या अल्पवयीन मुलीला.. केला अत्याचार; दोन दिवसानंतर झाला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 21:52 IST2022-06-21T21:48:34+5:302022-06-21T21:52:50+5:30

Nagpur News ५३ वर्षीय इसमाने आपल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दोन दिवसानंतर घटनेचा खुलासा झाल्याने मुलीच्या वडिलांनी व परिसरातील नागरिकांनी आरोपीला चांगलेच धुनकले.

Abuse of a friend's minor daughter; The revelation came two days later | 'चल तुझ्या वडिलांना शोधू..' असे म्हणून नेले मित्राच्या अल्पवयीन मुलीला.. केला अत्याचार; दोन दिवसानंतर झाला खुलासा

'चल तुझ्या वडिलांना शोधू..' असे म्हणून नेले मित्राच्या अल्पवयीन मुलीला.. केला अत्याचार; दोन दिवसानंतर झाला खुलासा

ठळक मुद्देनागरिकांनी आरोपीला चांगलेच धुनकले

नागपूर : ५३ वर्षीय इसमाने आपल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दोन दिवसानंतर घटनेचा खुलासा झाल्याने मुलीच्या वडिलांनी व परिसरातील नागरिकांनी आरोपीला चांगलेच धुनकले. ही घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीचे नाव तालीब कमाल उर्फ बैहरा खालिद अंसारी आहे.

६ वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांसोबत तालीब अंसारी मजुरी करीत होता. परिचित असल्याने अंसारीचे मुलीच्या घरी जाणे येणे होते. १८ जून रोजी रात्री ८ वाजता अंसारी मुलीच्या घरी आला. त्यावेळी मुलगी व तिचा भाऊ घरात होते. आई-वडील बाहेर गेले होते. अंसारीने मुलीला व तिच्या भावाला चॉकलेट घेऊन देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. भावाला चॉकलेट घेऊन घरी पाठविले व वडिलाचा शोध घेऊ म्हणून तो मुलीला आपल्या घरी घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार केला व घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी मुलीला त्रास होत असल्याने तिच्या आईने मुलीला विचारणा केली. आईला मुलीने घटनेची माहिती दिली. त्यामुळे वडील व वस्तीचे लोकं अंसारीच्या घरी गेले. त्याची चांगलीच धुलाई करीत पाचपावली पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.

- यापूर्वीही अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

यापूर्वी २०१५ मध्ये अंसारीने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले होते. याप्रकरणी तो १८ महिने कारागृहात होता. तो विकृत मानसिकतेचा असून, त्याला घरी येऊ देणे हे मुलीच्या आई-वडिलांना चांगलेच महागात पडले.

Web Title: Abuse of a friend's minor daughter; The revelation came two days later