शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

पूर्व नागपुरात सव्वा दोन लाखांची रोकड सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:50 AM

पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रजापती चौक येथे एका वाहनातून २ लाख ३८ हजारांची रोकड सापडली. ही रोकड वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रजापती चौक येथे एका वाहनातून २ लाख ३८ हजारांची रोकड सापडली. ही रोकड वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.निवडणुकीच्या काळात काळ्या पैशाचा वापर होण्याची शक्यता असल्याने यावर पाळत ठेवण्यासाठी एसएसटी पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाद्वारे नाकाबंदी करून वाहनांची चौकशी करण्यात येत आहे. प्रजावती चौक येथे तपासणीदरम्यान एका चारचाकी वाहनात २ लाख ३८ हजार ३०० रुपये मिळाले. चौगुले नामक व्यक्तीची ही रोकड असल्याचे सांगण्यात येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती हा वरोरावरून ट्रक खरेदी करण्यासाठी कामठीत आला होता. मात्र त्याला ट्रक खरेदी करता आला नसल्याने नागपुरात आला. येथेही ट्रक मिळाला नाही. वरोराकडे परत जात असताना पथकाला तपासणीदरम्यान ही रक्कम मिळाली. संबंधितास रकमेबाबत खुलासा मागण्यात आला. आवश्यक माहिती देण्यासाठी तीन, चार तासांचा वेळ देण्यात आला. मात्र त्याच्याकडून आवश्यक माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे रात्रीच्या सुमारास ही रक्कम वाठोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. पुढील चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MONEYपैसाnagpur-east-acनागपूर पूर्व