Abhijit Bangar gets the Bongirwar Award at the hands of Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिजित बांगर यांना बोंगीरवार अवॉर्ड प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते अरूण बोंगीरवार पब्लिक  सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड स्विकारताना महापालिका आयुक्त अभिजित बांगर. यावेळी उपस्थित वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व मान्यवर.

ठळक मुद्देनागपूर महापालिका आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्डस् प्रदान करण्यात आले. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह डॉ. अभिनव देशमुख, अश्विनी सोनवणे, एन. वासुदेवन आणि जितेंद्र रामगावकर आदींचा यात समावेश आहे. यावेळी वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, दीपक पारेख, गिरीश कुबेर, संगीता जिंदाल, लता बोंगीरवार आदी उपस्थित होते.
कार्यक्षम प्रशासनावर बोलताना यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर, कल्पकता आणि अधिकार हाती असताना विनयशीलता याची गरज प्रतिपादित केली. चांगला अधिकारी कोणता तर जो लोकाभिमुख असेल, नागरिकांशी ज्याचा थेट संपर्क असेल आणि प्रत्येक कामाकडे तो सकारात्मकतेने पाहत असेल. केवळ सकारात्मक दृष्टिकोन बाळगला तरी आपण ९० टक्के प्रश्न सहजतेने सोडवू शकतो. लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपला हातभार लागणे, ही सर्वात मोठी संधी असते. नोकरीत असताना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे यापेक्षा दुसरा कोणता मोठा पुरस्कार असू शकत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

Web Title: Abhijit Bangar gets the Bongirwar Award at the hands of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.