अभिजित बांगर नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 23:14 IST2020-03-19T23:13:36+5:302020-03-19T23:14:44+5:30
अभिजित बांगर यांची नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आज गुरुवारी एकूण सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले.

अभिजित बांगर नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभिजित बांगर यांची नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. आज गुरुवारी एकूण सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले.
अभिजित बांगर हे मनपा आयुक्त होते. अलीकडेच त्यांची बदली वस्त्रोद्योग विभागाचे संचालक म्हणून करण्यात आली होती. परंतु त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नव्हता. गुरुवारी त्यांच्या बदली आदेशात अंशत: बदल करण्यात आले. त्यानुसार त्यांची नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त या रिक्त पदावर बदली करण्यात आली. या पदावर पूर्वी अश्विन मुदगल होते. त्यांची नुकतीच मुंबई सिडको येथे बदली झाली. त्यानंतर हे पद रिक्त होते. या रिक्त जागेवर बांगर यांची नियुक्ती करण्यात आली.