अबब... गाईच्या पाेटातून काढले ८० किलाे प्लास्टिक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:43+5:302021-05-23T04:07:43+5:30

नागपूर : प्लास्टिक कचऱ्याचा भस्मासुर मुक्या जनावरांसाठी कसा जीवघेणा ठरताे, याचे ताजे उदाहरण शनिवारी निदर्शनास आले. एका गाईच्या ...

Abb ... 80 kg of plastic removed from cow's stomach () | अबब... गाईच्या पाेटातून काढले ८० किलाे प्लास्टिक ()

अबब... गाईच्या पाेटातून काढले ८० किलाे प्लास्टिक ()

नागपूर : प्लास्टिक कचऱ्याचा भस्मासुर मुक्या जनावरांसाठी कसा जीवघेणा ठरताे, याचे ताजे उदाहरण शनिवारी निदर्शनास आले. एका गाईच्या पाेटात गेलेला तब्बल ८० प्लास्टिकचा कचरा डाॅक्टरांनी बाहेर काढला. डाॅक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नाने मरणाच्या दारात गेलेल्या गाईला जीवदान मिळाले. आता त्या गाईची प्रकृती स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महालच्या बडकस चाैक परिसरात एक गाय अस्वस्थ असल्याचे गाेप्रेमी सुनील मानसिंगा यांना दिसून आली. मानसिंगा हे परिसरातील गाईंना आस्थेने चारा टाकत असतात. मात्र या गाईबद्दल त्यांना वेगळाच संशय आला. या गाईचे पाेट खूप माेठे झालेले हाेते आणि रवंथ करताना तिच्या पाेटातील चारा नाक व ताेंडावाटे बाहेर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पशुवैद्यकांकडे संपर्क केला. लागलीच पशुतज्ज्ञ तेथे पाेहोचले व गाईची तपासणी करण्यात आली. गाईला हाेत असलेला हा त्रास तिच्या पाेटात बऱ्याच वर्षापासून जमा हाेत असलेल्या प्लास्टिकमुळेच हाेत असल्याचे आणि हे प्लास्टिक बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार या गाईला धंताेली येथील गाेरक्षण सभा येथे आणण्यात आले.

त्यानंतर गाेरक्षण येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात डाॅ. मयूर काटे व त्यांचे सहकारी पशुधन पर्यवेक्षक शेखर मेश्राम व मुकेश चवरे यांनी या गाईवर शस्त्रक्रिया केली. तिच्या पाेटातून हा कचरा बाहेर काढला तेव्हा सर्वांचे डाेळे माेठे झाले हाेते. गाईच्या पाेटातून एक दाेन नव्हे तर तब्बल ८० किलाे प्लास्टिक बाहेर काढण्यात आले. अनेक वर्षापासून हळूहळू ते प्लास्टिक तिच्या पाेटात जमा झाले हाेते. त्यामुळेच तिला असहनीय झाले हाेते. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे तिला वाचविता आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. मात्र या उदाहरणावरून प्लास्टिकच्या कचऱ्याने किती घातक रूप धारण केले आहे आणि त्याचा वापर टाळण्याची वेळ आली आहे, ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे.

Web Title: Abb ... 80 kg of plastic removed from cow's stomach ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.