अबब! रद्द तिकिटांमधून रेल्वेला १५२ कोटींचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 01:45 AM2019-03-13T01:45:03+5:302019-03-13T07:06:48+5:30

मध्य रेल्वेची आकडेवारी; तत्काळमधून १४७ कोटी मिळाले

Aab! Revenue from Railways to Rs 152 crores for canceled tickets | अबब! रद्द तिकिटांमधून रेल्वेला १५२ कोटींचा महसूल

अबब! रद्द तिकिटांमधून रेल्वेला १५२ कोटींचा महसूल

googlenewsNext

नागपूर : अनेकदा आगाऊमध्ये आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांना रद्द करण्याची वेळ येते व यासाठी रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. २०१८ या एका वर्षात एक कोटीहून अधिक लोकांनी तिकिटे रद्द केली व यातून दीडशे कोटींहून अधिकचा महसूल रेल्वेला प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी माहितीच्या अधिकारात मध्य रेल्वेकडे विचारणा केली होती. २०१८ मध्य रेल्वेला किती महसूल प्राप्त झाला, तिकिटे रद्द केल्यामुळे मिळालेला महसूल, रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारणा केली होती. रेल्वेने अशा प्रवाशांकडून किती दंड वसूल केला, या कालावधीत किती भिक्षेकरी व तृतीयपंथींयांवर कारवाई झाली, हे प्रश्न त्यांनी विचारले होते. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत १ कोटी ४७ लाख ७४ हजार ६२३ लोकांनी तिकीट रद्द केले व त्यातून रेल्वेला १५२ कोटी २५ लाख ८४ हजार ९३८ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. याशिवाय तत्काळ तिकिटांमधून १४९ कोटी २९ लाख ६७ हजार ४८८ रुपयांचा महसूल मिळाला. ‘प्रीमियम’ तिकिटांपोटी ८३ कोटी ८३ लाख ७२ हजार ५७४ रुपयांचा महसूल मिळाला. तर नागपूर विभागाला विविध माध्यमांतून २०१८ या वर्षात मध्य रेल्वेला ३६ कोटी ६९ लाख ८९ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.

तृतीयपंथीयांवर कारवाई
वर्षभरात २४२ तृतीयपंथींयावर कारवाई करण्यात आली. २०१८ मध्ये तृतीयपंथीयांकडून ३ लाख ४३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय १८ भिक्षेकऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली, तर अनधिकृत पार्किंगप्रकरणी ४३५ जणांवर कारवाई झाली.

Web Title: Aab! Revenue from Railways to Rs 152 crores for canceled tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.