बाईकने ट्रिपलसीट चाललेल्या युवकांना मालवाहू वाहनाने मारला कट; दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 20:52 IST2022-02-14T20:52:10+5:302022-02-14T20:52:34+5:30
Nagpur News बाईकने ट्रिपल सीट चाललेल्या युवकांना टाटा एस या मालवाहू वाहनाने कट मारला. यात झालेल्या अपघातात बाईकस्वार दोन युवकांचा मृत्यू झाला.

बाईकने ट्रिपलसीट चाललेल्या युवकांना मालवाहू वाहनाने मारला कट; दोघे ठार
नागपूर : बाईकने ट्रिपल सीट चाललेल्या युवकांना टाटा एस या मालवाहू वाहनाने कट मारला. यात झालेल्या अपघातात बाईकस्वार दोन युवकांचा मृत्यू झाला. भिवापूर महामार्गावरील ठाणा शिवारात सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात घडला.
मुकेश विनायक बांडेबुचे (वय ३१), हरिदास देवराव ठमके (३२) अशी मृत तरुणांची, तर नीतेश विनायक बांडेबुचे (४०, तिघेही रा. पांजरेपार (पुनर्वसन), ता. भिवापूर) असे जखमीचे नाव आहे. हे तिघेही (एमएच -४०- ए. व्ही. ३२३५) क्रमांकाच्या बाईकने पांजरेपार येथून उमरेडकडे येत होते. ठाणा शिवारात असताना टाटा एस मालवाहू वाहनाची जोरदार कट बाईकला लागली.
यामध्ये मुकेश बांडेबुचे आणि हरिदास ठमके यांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत मुकेश बांडेबुचे याचा मोठा भाऊ नीतेश गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.
अज्ञात टाटा एस मालवाहूच्या चालकाने वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणाने आणि झिकझॅक पध्दतीने चालविल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. अपघातानंतर टाटा एसचा चालक पसार झाला. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात भांदवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) भादवी, १३४ (अ) (ब), १७७, १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे करीत आहेत.