तणावातून नवव्या माळ््यावरून उडी घेत महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 23:50 IST2023-03-25T23:50:04+5:302023-03-25T23:50:04+5:30
नागपूर : चुलतभावाच्या वाढदिवसासाठी नागपुरात आलेल्या ३२ वर्षीय महिलेने तणावातून नवव्या माळ््यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना इमामवाडा ...

तणावातून नवव्या माळ््यावरून उडी घेत महिलेची आत्महत्या
नागपूर : चुलतभावाच्या वाढदिवसासाठी नागपुरात आलेल्या ३२ वर्षीय महिलेने तणावातून नवव्या माळ््यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाटा कॅपिटल हाईट्स येथे शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
आदिती गिरीश लखानी (३२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदिती आपली आई आणि भावासोबत पुण्यात राहते. शुक्रवारी आपल्या चुलतभावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती टाटा कॅपिटल हाईट्स येथे काकाच्या घरी आली होती. पाच वर्षांपूर्वी आदितीचे लग्न झाले होते. त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर आदिती तणावात राहत होती. शनिवारी सकाळी सहा वाजता आदिती आपल्या काकाच्या नवव्या माळ््यावरील काकाच्या फ्लॅटच्या गॅलरीत बसली होती. अचानक तिने नवव्या माळ््यावरून उडी घेतली. घटनेची सुचना मिळताच इमामवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला. इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. शनिवारी शोकाकुल वातावरणात आदितीवर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
..............