हिंगण्याजवळ नाल्यात आढळले वाघिणीचे शव, श्वसनक्रिया बंद पडल्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 16:30 IST2022-10-29T16:27:21+5:302022-10-29T16:30:26+5:30
शुक्रवारी संध्याकाळी वनपरिक्षेत्राचे कर्मचारी गस्त घालत असताना ही घटना उघडकीस आली.

हिंगण्याजवळ नाल्यात आढळले वाघिणीचे शव, श्वसनक्रिया बंद पडल्याचा अंदाज
नागपूर : हिंगणा वन परिक्षेत्रात एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली आहे. या वाघिणीचे वय अंदाजे ३-४ वर्ष असून श्वसनक्रिया बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी संध्याकाळी वनपरिक्षेत्राचे कर्मचारी गस्तीवर असताना ही घटना उघडकीस आली.
हिंगणा वन परिक्षेत्र, नेरी मानकर नियत वनक्षेत्रात एका नाल्यात ही वाघीण मृतावस्थेत आढळून आली. त्यांनी लागलीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर फॉरेन्सिककरीता नमुने घेण्यात आले असुन RFL नागपूर येथे पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर पंचनामा नोंदवण्यात आला.
रात्र झाली असल्याने शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी सकाळी करण्याचे ठरले. आज सकाळी हिंगणा वनपरिक्षेत्र चे कर्मचारी यांनी NTCA च्या मार्गदर्शन सूचना नुसार कार्यवाही केली. घटनेचा पुढील तपास आशिष निनावे सहायक वनसंरक्षक (अतिरिक्त कार्यभार) नागपूर हे करीत आहेत.