शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

एक दुजे के लिए! हातात हात घालून कपलची रेल्वेसमोर उडी; नातेवाईकांच्या विरोधाने टोकाचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 14:05 IST

कन्हान रेल्वे मार्गावरील साई मंदिर परिसरात रेल्वे रुळावर प्रेमी युगुलाने हातात हात घालून धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देनवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील घटना

कामठी (नागपूर) : नागपुरात अल्पवयीन प्रेमीयुगुलाने हातात हात घालून हावडा अहमदाबाद एक्सप्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास उघडकीस आली.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी कळमना मार्गावरील जयभीम चौक परिसरातील आदित्य लक्ष्मीनारायण कुरील (वय १८) व त्याच परिसरातील सायली गौतम नगराळे (वय १६) यांची गेल्या ३ वर्षापासून मैत्री होती. हळूहळू भेटीगाठी वाढल्या व मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

अल्पवयीन प्रेमीयुगल भावी संसाराची स्वप्न बघत असताना लग्नाचा विचार मनात आला. परंतु लग्नाकरिता वय कमी व  घरच्यांचा विरोध असल्यानं काय करावं, अशा दोघेही विचारात होते. यातच गुरुवारी दोघेही घरी कोणालाही कळू न देता दुचाकीने (एम एच ४० डी २६७८) पसार झाले. त्याच दिवशी दोघांच्या घरच्यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात अल्पवयीन तरुण-तरुणी घरी न सांगता निघून गेल्याची तक्रार केली. यानंतर नवीन कामठी पोलिसांनी मिसिंग ची नोंद करून तपास सुरू केला.

घरच्यांनी व पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध केली, परंतु कुठेही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. एकमेकांवरील प्रेम व घरच्यांचा विरोध यातून कसा मार्ग काढायचा या विवंचनेत दोघे असावेत. यातूनच त्यांनी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास कामठी कन्हान रेल्वेमार्गावरील कन्हान नदी पुलाजवळील आडा पुलाजवळ हावडावरून आमदाबादला जाणाऱ्या एक्सप्रेससमोर हातात हात घालून उडी घेऊन आत्महत्या केली.

शनिवारी सकाळी दोघांचेही मृतदेह सापडले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे सहकार्‍यांसोबत घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दोन्ही प्रेत उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. घटनास्थळावरून पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. तर, या घटनेने जयभीम चौक परिसरात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूरrailwayरेल्वे