गॅस सिलेंडर बदलत असताना झाला अचानक स्फोट; आई व मुलगी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2022 20:49 IST2022-09-12T20:49:02+5:302022-09-12T20:49:44+5:30
Wardha News कारंजा घाडगे तालुक्यातील भालेवाडी येथील राजेश कडवे यांच्या घरी लावून असलेला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली.

गॅस सिलेंडर बदलत असताना झाला अचानक स्फोट; आई व मुलगी जखमी
वर्धा : कारंजा घाडगे तालुक्यातील भालेवाडी येथील राजेश कडवे यांच्या घरी लावून असलेला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली.
कडवे यांच्या घरी सिलिंडर संपल्यामुळे दुसरे सिलिंडर लावले जात असता त्या सिलिंडरचा स्फोट झाला त्या स्फोटामध्ये राजेश कडवे यांची पत्नी रत्नमाला राजेश कडवे (३०) , मुलगी स्वरा राजेश कडवे (८ महिने) ही जखमी झाली. रत्नमाला हिची साडी जळाली असून हाताला भाजले आहे तसेच डोक्याची केस जळाले असून स्वराच्या पायाला भाजले आहे सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर गॅस बंद होत नव्हता नंतर गॅस कंपनीचे कर्मचारी आल्यानंतर त्यांनी तो गॅस बंद केला अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली