शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्न, विद्यार्थिनीचा हात घसरला अन्...; जिवाचा थरकाप उडवणारी घटना

By नरेश डोंगरे | Updated: December 24, 2023 22:50 IST

धावा धावा, बघा, वाचवा अशी आरडाओरड सुरू झाली. 

नागपूर : धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात तिचा हात निसटला अन् ती प्लॅटफॉर्म तसेच रेल्वे गाडीच्या  गॅपमध्ये सापडली. ते दृश्य अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारे होते. धावा धावा, बघा, वाचवा अशी आरडाओरड सुरू झाली. 

त्या क्षणांत तिचा जीवन-मृत्यूचा संघर्ष सुरू असताना रेल्वे कर्मचारी आणि लोहमार्ग पोलिस देवदूत म्हणून धावले अन् मदतीचा हात देऊन तिचा जीव वाचविला. जिवाचा थरकाप उडविणारी ही घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. स्वर्णिमा असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नांदखेड (अकोला) येथील रहिवासी आहे. वडील शेतकरी आहेत. तिला एक  भाऊ आणि दोन बहिणी आहेत. सध्या ती सदरच्या वसतिगृहात राहून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसर्‍या वर्षाला शिकते.

महाविद्यालयाला सुट्या लागल्याने तिने घरी जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वर आली. तिला गोंदिया-अकोला महाराष्ट्र एक्सप्रेसने जायचे होते. मात्र, गाडीत गर्दी असल्याने ती बसू शकली नाही. तेवढ्यात गाडी सुटली अन् स्वर्णिमाची धावपळ उडाली. जनरल डब्यात बसण्यासाठी तिने एका हाताने दरवाजाचा लोखंडी दांडा पकडला मात्र हात सैल झाला आणि तिचा संघर्ष सुरू झाला. सुदैवाने  शेवटचा डबा असल्याने गाडी पुुढे निघून गेली. ती खाली पडली. रेल्वे कर्मचारी आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय मरापे यांनी तिला तात्काळ रुळावरून फलाटावर घेतले.  स्वर्णिमाच्या एका पायाला जबर जखम झाल्याने ती रक्तबंबाळ झाली. या घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. दरम्यान लोहमार्ग पोलिस रंजना कोल्हे, रेल्वे डॉक्टर तेथे पोहोचल्या. प्राथमिक उपचारानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सर्वच हादरले- 

या घटनेची माहिती स्वर्णिमाच्या वडिलांसह वसतिगृहातील प्रमुखांना देण्यात आली. काही वेळातच वसतिगृहाच्या प्रमुख आणि विद्यार्थिनींनी रुग्णालयात गर्दी केली. ती धोक्याबाहेर असल्याचे कळल्याने सर्वांनीच त्या देवदूतांचे आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे