नागपुरात बेदरकार वाहतुकीने आणखी एका निष्पाप मुलाचा बळी घेतला आहे. इयत्ता दहावीचा पेपर सोडवून आईसोबत दुचाकीने घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना पिवळी नदी पार्किंग प्लाझासमोर घडली. अथर्व चंद्रशेखर मेश्राम (वय, १६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेमुळे नागपूरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अथर्व हा सीबीएसई बोर्डाचा विद्यार्थी होता. मंगळवारी त्याचा दहावीचा पेपर होता. परीक्षा संपल्यानंतर त्याची आई रिना मेश्राम (वय, ४०) त्याला घेण्यासाठी कामठी मार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये गेल्या होत्या. दुपारी दोन वाजताच्या सुमारास माय-लेक दुचाकीने घराकडे परतत असताना, पार्किंग प्लाझासमोर मागून येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
ट्रकच्या धडकेमुळे अथर्व आणि त्याची आई दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या भीषण अपघातात अथर्वला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोघांनाही जवळच्या होप रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी अथर्वला मृत घोषित केले. पोटच्या गोळ्याचा आपल्या डोळ्यादेखत झालेला हा अंत पाहून आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे. या अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. चंद्रशेखर मेश्राम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : In Nagpur, a 10th-grade student, Atharva Meshram, died after being hit by a speeding truck while returning home with his mother after his exam. The driver fled; police are investigating.
Web Summary : नागपुर में दसवीं कक्षा के छात्र अथर्व मेश्राम की परीक्षा देकर माँ के साथ लौटते समय तेज रफ्तार ट्रक से कुचलकर मौत हो गई। चालक फरार, पुलिस जांच कर रही है।