विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवायांचे सत्र; म्हात्रे व्हिडीओ प्रकरणातील खरा आरोपी आमदार सुर्वेंचा मुलगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2023 21:45 IST2023-03-14T21:45:24+5:302023-03-14T21:45:52+5:30

Nagpur News शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांवर रोज वेगवेगळे आरोप केले जात आहेत. आवाज दाबण्यासाठी तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत, असा आरोप युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केला आहे.

A session of operations on the leaders of the opposition; The real accused in the Mhatre video case is MLA Surve's son | विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवायांचे सत्र; म्हात्रे व्हिडीओ प्रकरणातील खरा आरोपी आमदार सुर्वेंचा मुलगा

विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच कारवायांचे सत्र; म्हात्रे व्हिडीओ प्रकरणातील खरा आरोपी आमदार सुर्वेंचा मुलगा

नागपूर : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांवर रोज वेगवेगळे आरोप केले जात आहेत. आवाज दाबण्यासाठी तपास यंत्रणांच्या माध्यमातून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाया होत आहेत, असा आरोप युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केला आहे. नागपुरात ते मंगळवारी पक्षाच्या बैठकीसाठी आले होते. तेव्हा ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आहे, त्यांनीच तो संपूर्ण व्हिडीओ त्याच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केला होता. त्यामुळे या प्रकरणी कोणाला अटक व्हायची असेल तर ती राज सुर्वे यांना व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन वरुण सरदेसाई यांनी केले. जर व्हिडीओ मॉर्फ केला असेल तर खरा व्हिडीओ कुठे आहे, असा सवाल करत या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलिस सक्षम आहेत. ते खऱ्या आरोपीला अटक करतील, असे ते म्हणाले.

Web Title: A session of operations on the leaders of the opposition; The real accused in the Mhatre video case is MLA Surve's son