नागपूरच्या विद्यार्थ्यांचे सॅटेलाइट अवकाशात

By मंगेश व्यवहारे | Updated: February 20, 2023 21:30 IST2023-02-20T21:29:47+5:302023-02-20T21:30:51+5:30

Nagpur News मार्टिन फाउंडेशन, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडियाच्या समन्वयाने संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाइन लाँच मिशन-२०२३ तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील पट्टीपोलम गावातून अवकाशात सोडण्यात आले.

A satellite of Nagpur students in space | नागपूरच्या विद्यार्थ्यांचे सॅटेलाइट अवकाशात

नागपूरच्या विद्यार्थ्यांचे सॅटेलाइट अवकाशात

नागपूर : मार्टिन फाउंडेशन, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडियाच्या समन्वयाने संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाइन लाँच मिशन-२०२३ तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील पट्टीपोलम गावातून अवकाशात सोडण्यात आले. एका रॉकेटच्या साहाय्याने १५० पिको सॅटेलाइन अवकाशात सोडण्यात आले. यात नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या १० पिको सॅटेलाइटचा समावेश होता. या लाँचिंगच्या वेळी महापालिकेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलामतर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन -२०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या मिशनअंतर्गत देशभरातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले १५० सॅटेलाइट रॉकेटद्वारे अवकाशात सोडण्यापर्यंतच्या या प्रवासात दोन महिन्यांचा कालावधी लागला. या दीडशे सॅटेलाइटमध्ये नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांचे १० सॅटेलाइट होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. सॅटेलाइट बनविण्यासाठी नागपुरात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत बनविण्यात आलेले सॅटेलाइट रविवारी लॉचिंगद्वारे अवकाशात सोडण्यात आले.

Web Title: A satellite of Nagpur students in space