शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२० एप्रिल रोजी दुर्लभ 'हायब्रीड सूर्यग्रहण'; २२, २३ ला उल्कावर्षाव पाहण्याची संधी

By निशांत वानखेडे | Updated: April 18, 2023 14:53 IST

सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, इंटरनेटच्या माध्यमातून घ्या आनंद

नागपूर : खग्रास आणि खंडग्रास अशा दाेन्ही प्रकारात दिसणारे हायब्रीड सूर्यग्रहण येत्या २० एप्रिल राेजी हाेत आहे. वर्षातील पहिले व अतिशय दुर्लभ असे हे सूर्यग्रहण भारतातून मात्र दिसणार नाही पण इंटरनेटच्या माध्यमातून त्याचा आनंद घेता येईल. सूर्यग्रहण दिसणार नसले तरी खगाेलप्रेमींना २२ व २३ राेजी लायरिड उल्कावर्षाव पाहण्याची संधी मात्र मिळणार आहे.

२० राेजीचे सूर्यग्रहण दक्षिण पासिफिक महासागरातून दिसेल. कंकणाकृती ग्रहणाला तिथूनच सुरवात होईल. पुढे पाश्चिम आस्ट्रेलियाच्या ठिकाणी, पापुआगिनी, इंडोनेशियाची दक्षिण बेटे येथून मात्र खग्रास ग्रहण दिसेल. उर्वरित इंडोनेशिया, मलेशिया, फिलीप्पिनस या पूर्व आशियातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. ग्रहणाच्या सुरवातीला आणि शेवटी हे ग्रहण कंकणाकृती दिसेल तर मध्य काळात हे ग्रहन खग्रास दिसेल. एकाच वेळेस कंकणाकृती आणि खग्रास ग्रहण दिसत असल्यामुळे ह्याला हायब्रीड सूर्यग्रहण असे म्हणतात. पृथ्वीच्या गोल आकारामुळे आणि कमी-अधिक उंची/अंतरामुळे एकाच दिवशी कुठे कंकणाकृती तर कुठे खग्रास सूर्यग्रहण पहावयास मिळते. दशकातून एखादे वेळेसच असे दुर्मिळ हायब्रीड सूर्यग्रहण होत असते आणि शतकात ही शक्यता केवळ ३ टक्के असते. हे सूर्यग्रहण अश्विनी नक्षत्रात आणि मेष राषीत घडणार आहे. संपूर्ण ग्रहण ५ तास २४ मिनिटांचे असेल.

दरवर्षी २२, २३ एप्रिलदरम्यान दिसणारा लायरीड उल्कावर्षाव यावर्षीसुद्धा चांगला दिसण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या १५ ते २९ तारखे दरम्यान उत्तर-पूर्व दिशेला लायरा तारासमूहात दिसणारा हा उल्कावर्षाव २२-२३ रोजी मोठया संख्येने दिसतो अशी माहिती, रमन विज्ञान केंद्राचे महेंद्र वाघ यांनी सांगितली.

उत्तर-पूर्व दिशेला सूर्य मावळल्यानंतर लायरा तारा समूहात वेगा ताऱ्याजवळ हा उल्कावर्षांव पाहता येईल. रात्री १० ते मध्यरात्री पर्यंत हा चांगला दिसू शकेल. ताशी १५ ते २५ उल्का दिसू शकतील, असा अंदाज आहे. हा उल्कावर्षाव थॅचर धूमकेतूमुळे दिसतो. १८६१ मध्ये हा धूमकेतू पृथ्वीजवळुन गेला होता तेंव्हापासून हा उल्कावर्षाव दिसत आहे. पुढे जेव्हा पृथ्वीचा भ्रमणमार्ग जवळून जाईल तेव्हा २० वर्षांनंतर २०४२ मध्ये खुप मोठा उलकावर्षाव दिसणार आहे.

टॅग्स :scienceविज्ञानsolar eclipseसूर्यग्रहण