शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मित्रच झाला हैवान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जबरदस्तीने गर्भपात

By योगेश पांडे | Updated: August 10, 2023 17:47 IST

जीवे मारण्याचीदेखील धमकी : २१ वर्षीय आरोपीला अटक

नागपूर : मैत्रीमध्ये ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व ती गर्भवती राहिल्यावर जबरदस्तीने गर्भपात करवला. इतकेच नाही तर त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार करत तिला जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

विशाल हनुमंत पिल्लेवान (२१) असे आरोपीचे नाव आहे. त्याची १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळखी होती. मुलीने मित्रत्वाच्या नात्याने त्याच्यावर विश्वास टाकला व त्याच्यासोबत ती फिरायला जात होती. त्याने फेब्रुवारी महिन्यात तिला शीतपेय पाजले. त्यात त्याने गुंगीचे औषध मिळविले होते. तिला चक्कर आल्यासारखे वाटल्याने तिला तो गाडीवर बसवून स्वत:च्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने बळजबरीने अत्याचार केला.

काही दिवसांनी मुलगी गर्भवती असल्याचे कळाल्यावर विशालने तिला गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला. मात्र यावरच विशाल थांबला नाही. मुलीने त्याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला. संतापात त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली व मारहाण केली. त्यानंतर त्याने वारंवार धमक्या देत तिच्यावर अत्याचार केले. त्याने अनेकदा तिचा पाठलागदेखील केला. अखेर मुलीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी विशालविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणPregnancyप्रेग्नंसीAbortionगर्भपात