मेट्रो स्टेशनचा पाईप तुटून कारवर आदळला; जिवीतहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 20:51 IST2023-04-05T20:51:06+5:302023-04-05T20:51:37+5:30
Nagpur News सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील दौसर वैश्य चौकातील मेट्रो स्टेशनचा एक पाइप तुटल्याने खाली पार्क केलेल्या एका कारवर पडला. त्यामुळे कारचे छत चेपले व मागची काच फुटली.

मेट्रो स्टेशनचा पाईप तुटून कारवर आदळला; जिवीतहानी नाही
नागपूर : सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील दौसर वैश्य चौकातील मेट्रो स्टेशनचा एक पाइप तुटल्याने खाली पार्क केलेल्या एका कारवर पडला. त्यामुळे कारचे छत चेपले व मागची काच फुटली. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली.
ही कार व्यावसायिक परमजित सिंह बत्रा यांची होती. ते म्हणाले की, माझ्या कारचा इन्श्युरन्स आहे. घटनेची मला तक्रारही करायची नाही. परंतु, अशा घटना पुन्हा व्हायला नको, जीव जाण्याचा धोका असतो. मेट्रो स्टेशनच्या बांधकामात वापरलेले पाइप मजबूत असायला हवेत. घटनेसंदर्भात महामेट्रोचे अखिलेश हळवे म्हणाले की, घटनेची चौकशी केल्यानंतर जो दोषी आहे, त्यावर कारवाई होईल.