शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
4
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
5
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
6
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
7
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
8
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
9
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
10
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
11
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
12
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
13
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
14
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
15
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
16
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
17
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
18
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
19
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

जीन लागल्याचे सांगून एक लिंबू कापले.. भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मनोरुग्ण मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:44 IST

सत्र न्यायालय : सावनेर पोलिसांच्या क्षेत्रातील घटना, जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गतही दोषी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूताची बाधा दूर करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मनोरुग्ण मुलीवर बलात्कार करणारा ढोंगी बाबा व त्याच्या साथीदाराला मंगळवारी दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, दंड न भरल्यास दोन्ही आरोपींना सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना सावनेर पोलिसांच्या क्षेत्रामधील आहे.

मनोहर मारोती कोल्हे (५८) असे ढोंगी बाबाचे तर, युवराज धनराज सोनटक्के (४३) असे साथीदाराचे नाव आहे. सोनटक्के पहलेपार तर, कोल्हे हेटी येथील रहिवासी आहे. घटनेच्यावेळी पीडित मुलगी करिना (काल्पनिक नाव) १७ वर्षे वयाची होती. तिच्यावर मनोरुग्णालयात उपचार सुरू होते, पण तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. दरम्यान, ३ मे २०२२ रोजी सोनटक्के करिनाच्या पालकांना भेटला व करिनाला भूतबाधा झाली असेल, असा संशय व्यक्त करून तिला कोल्हेकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. कोल्हेकडे बरेच लोक १०० टक्के दुरुस्त झाले आहेत, असेही त्याने सांगितले. त्यामुळे पालकांनी करिनाला कोल्हेकडे नेले. सोनटक्केही त्यांच्यासोबत होता. त्यावेळी कोल्हेने करिनाला जीन लागल्याचे सांगून एक लिंबू कापले व त्यावर कापूर जाळून उतारा काढला. करिनाच्या कंबरेला बांधण्यासाठी काळा दोरा दिला. तसेच, करिनाला एका रात्रीसाठी स्वत:जवळ ठेवून घेतले. त्यानंतर कोल्हे व सोनटक्केने करिनावर बलात्कार केला.

लहानपणापासून अनाथ

करिना लहानपणापासूनच अनाथ आहे. तिची आई २००६ तर, वडील २००८ मध्ये मरण पावले. ती एक वर्षाची होती तेव्हापासून आत्याकडे राहत आहे. आत्याच तिचे पालनपोषण व देखभाल करीत आहे. तिला समाजाकडूनही विशेष मदतीची गरज आहे. परंतु, सैतानी मानसिकतेच्या आरोपींनी तिच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला.

दोन्ही आरोपी दोषी

सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गतही दोषी ठरवून प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake exorcist rapes mentally ill minor; accomplice also convicted.

Web Summary : A quack exorcist and his accomplice received 10 years imprisonment for raping a minor under the guise of exorcism. The victim, a mentally ill girl, was exploited by the duo in Savner.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीHigh Courtउच्च न्यायालय