लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्य रेल्वेस्थानकाजवळ मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब प्रकल्प उभारण्याकरिता जमीन संपादित करायची असून त्यासाठी नगर विकास विभागाच्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने गेल्या १७ एप्रिल रोजी नगरोत्थान महाभियानांतर्गत ३१ कोटी ३३ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.
ट्रान्सपोर्ट हबसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्य प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ व नेहरू मॉडेल हायस्कूलची जमीन संपादित करण्यात येणार आहे. गेल्या २८ जुलै रोजी नगर विकास विभागाने या जमिनीचा
टेकडी व्यावसायिकांचे पुनर्वसन होईलमहानगरपालिकेद्वारे २९ सप्टेंबर २०१८ रोजी पारित ठरावानुसार या ट्रान्सपोर्ट हबमध्ये टेकडी गणेश उड्डाणपुलाखालील पात्र व्यावसायिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हावी, यासाठी व्यावसायिकांनी याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालय वेळोवेळी प्रभावी आदेश देत असल्यामुळे व्यावसायिकांच्या पुनर्वसनामधील एकेक अडथळे दूर होत आहेत.
पुढील कार्यवाहीची माहिती मागितलीया प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तिद्वय मुकुलिका जवळकर व प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने भूसंपादनासाठी निधी मंजुरीचा निर्णय रेकॉर्डवर घेऊन येत्या २५ सप्टेंबरपर्यंत पुढील कार्यवाहीची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. महेश धात्रक यांनी काम पाहिले.