कमाल चौकातील हार्डवेअरच्या दुकानाला आग
By मंगेश व्यवहारे | Updated: April 29, 2023 14:54 IST2023-04-29T14:54:27+5:302023-04-29T14:54:37+5:30
घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अवघ्या काही मिनिटातच पथक घटनास्थळी पोहचले होते.

कमाल चौकातील हार्डवेअरच्या दुकानाला आग
नागपूर : पाचपावली कमाल चौकात असलेल्या हार्डवेअरच्या दुकानाला सकाळी ६.४५ वाजता आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. शारदा बिल्डींगमध्ये घनश्याम लेंडे यांचे घनश्याम हार्डवेअर ॲण्ड पेंट चे दुकान आहे. पेंट हे ज्वलनशील पदार्थ असल्याने आग लागताच चांगलाच भडका उडाला होता.
घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अवघ्या काही मिनिटातच पथक घटनास्थळी पोहचले होते. ७ अग्निशमन बंबाच्या मदतीने सकाळी १० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आग लागण्याचे नेमके कारण कळले नाही. आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन विभाग आग लागण्यामागच्या कारणांचा शोध घेत आहे. दुकानमालकाने ३५ लाख रुपयांच्या नुकसानीचा दावा केला असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून मिळाली.