लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मामेबहिणीचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2023 22:24 IST2023-03-25T22:24:10+5:302023-03-25T22:24:40+5:30
Nagpur News लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मामेबहिणीचा उशीने तोंड दाबून खून केल्याची घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी १.३० ते २ वाजताच्या सुमारास घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मामेबहिणीचा केला खून
नागपूर : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या मामे बहिणीचा उशीने तोंड दाबून खून केल्याची घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी १.३० ते २ वाजताच्या सुमारास घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक करून ताब्यात घेतले असून मृतक गर्भवती असल्याची माहिती आहे.
पायल आकाश गजबे (३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राजु संभुजी पानतावणे (४०, प्लॉट नं. २२, घोगली, हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. तीन वर्षापूर्वी पायलचे लग्न झाले होते. परंतु पतीसोबत पटत नसल्यामुळे ती विभक्त राहत होती. मागील वर्षभरापासू ती आपल्या मामाचा मुलगा आरोपी राजुसोबत लिव्ह इन मध्ये राहत होती.
आरोपी राजुचा घोगलीत दुमजली घर आहे. तो प्लॉट विक्रीचा व्यवसाय करतो. लिव्ह इन मध्ये राहत असताना नेहमीच त्यांच्यात खटके उडत होते. शनिवारी २५ मार्चला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास त्यांच्यात जोरदार भांडण झाले. या वादातून आरोपी राजूने उशीने तोंड दाबल्यामुळे श्वास गुदमरून पायलचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी राजुने एका आॅटोचालकाला पायलची तब्येत बरी नसल्याचे सांगून एका आॅटोचालकाला घरी बोलावले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह मेडिकलमध्ये पाठवून आरोपी राजुला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपी राजुने खुनाची कबुली दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वर पोलिस करीत आहेत.