खेळणाऱ्या बालकाला दुचाकीस्वाराने धडक देऊन केले जखमी

By दयानंद पाईकराव | Updated: December 27, 2023 14:17 IST2023-12-27T14:17:56+5:302023-12-27T14:17:59+5:30

नागपूर : घराजवळ खेळत असलेल्या दहा वर्षांच्या बालकाला दुचाकीने धडक दिल्यामुळे तो जखमी झाला. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या ...

A child who was playing was hit by a bike rider and injured | खेळणाऱ्या बालकाला दुचाकीस्वाराने धडक देऊन केले जखमी

खेळणाऱ्या बालकाला दुचाकीस्वाराने धडक देऊन केले जखमी

नागपूर : घराजवळ खेळत असलेल्या दहा वर्षांच्या बालकाला दुचाकीने धडक दिल्यामुळे तो जखमी झाला. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी १.२० वाजताच्या सुमारास घडली.

मोहम्मद आझाद शाकीज (वय १०, रा. राय आशियाना फ्लॅट, मोतिबाग, पाचपावली) असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. तो टेका नवी वस्तीत नजम सोनोग्राफीसमोर खेळत होता. अज्ञात स्प्लेंडर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मो. आझादला धडक दिली. यात त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर दुचाकीस्वार पळून गेला. मुलावर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर या प्रकरणी मोहम्मद शाकीज नवाज मोहम्मद शाह (वय ५३) यांनी मंगळवारी २६ डिसेंबरला पोलिसात तक्रार दिली. पाचपावलीच्या उपनिरीक्षक संध्या कोळी यांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.

Web Title: A child who was playing was hit by a bike rider and injured