Corona Virus in Nagpur; हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरातून ९७५ क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 21:18 IST2020-04-28T21:17:53+5:302020-04-28T21:18:12+5:30
नागपुरात सतरंजीपुरा हॉट स्पॉट ठरला आहे.बहुतांश नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारी उशिरापर्यंत ४७२ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे या परिसरातून क्वारंटाईन करण्यात आलेल्यांचा आकडा ९७५ पर्यंत पोहचला होता.

Corona Virus in Nagpur; हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरातून ९७५ क्वारंटाईन
लोकत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात सतरंजीपुरा हॉट स्पॉट ठरला आहे.बहुतांश नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारी उशिरापर्यंत ४७२ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे या परिसरातून क्वारंटाईन करण्यात आलेल्यांचा आकडा ९७५ पर्यंत पोहचला होता. मंगळवार रात्री पुन्हा ही प्रक्रीया सुरू असल्याने क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांचा आकडा अंदाजे १२०० च्या घरात पोहचणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनामुळे या परिसरातील एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. २५ एप्रिलला त्याचा पॉझिटीव्ह अहवाल आला. त्यानंतर मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याला सुरुवात झाली. २२ एप्रिलपर्यंत २३०नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले. २३ एप्रिलला पुन्हा १५० नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले. सोमवारी रात्री पर्यंत हा आकडा ९७५ पर्यंत पोहचला.
सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे मनपाची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारीत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली.
संसर्गामुळे पॉझिटिव्हचा आकडा ८० पर्यंत पोहोचला
कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे २०० वर नागरिकांनी माहिती लपविली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. यातील ८० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. या बाधितांना वेळीं क्वारंटाईन केले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.
.......
-सोमवारी वनामती येथे क्वारंटाईन असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सतरंजीपुरा येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- वनामती येथे क्वारंटाईन ठेवलेल्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान त्याच्या भेटीला अनेक नातेवाईक आले. यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला.
-वाठोडा येथे क्वारंटाईन असलेल्या एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तिच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले