९५ लाखांनी फसवणूक
By Admin | Updated: June 6, 2014 00:48 IST2014-06-06T00:48:51+5:302014-06-06T00:48:51+5:30
गोकुळपेठ येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ९५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

९५ लाखांनी फसवणूक
नागपूर : गोकुळपेठ येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ९५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
किरण महल्ले (३४), अश्विनी किरण महल्ले (३0), नरेश तुलसीराम खंडवानी (४७) रा. छापरू चौक, मे. अरिहंत इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रमोद सुरेंद्रनाथ मिश्रा (४४) रा. मानकापूर, गणेश बळीराम गवई (४0) रा. रेल्वे कॉलनी अजनी, राजेंद्र अंकुरवार (२८) डायमंडनगर) अशी आरोपीची नावे आहेत.
मुख्य आरोपी किरण महल्ले याने आपल्या अँडव्हान्स काबरे अँण्ड पेस्ट मॅनेजमेंट कंपनीसाठी १२ मे २0१२ रोजी श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनीकडे कर्ज मागितले. यासाठी आरोपीने इतर आरोपीच्या संगनमताने गॅरंटीदार म्हणून बोगस दस्तऐवज फायनान्स कंपनीमध्ये जमा केले. ९५ लाखांचे कर्ज मिळाल्यावर आरोपीने कर्जाचे काही हप्ते व्यवस्थित भरले. परंतु त्यानंतर जाणीवपूर्वक हप्ते भरणे बंद केले.
फायनान्स कंपनी विधी व्यवस्थापक माणिकराव मोहोड (३२) यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)