नासुप्रचा ९०२. ५० कोटींचा अर्थसंकल्प
By गणेश हुड | Updated: March 5, 2024 18:19 IST2024-03-05T18:18:48+5:302024-03-05T18:19:08+5:30
टेकडी गणेश मंदीराचा विकास, वारकरी व ओबीसी भवन : दिव्यांगासाठी स्टेडियम उभारण्याचा संकल्प

नासुप्रचा ९०२. ५० कोटींचा अर्थसंकल्प
नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाने ९०२ कोटी ५० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. अर्थसंकल्पात टेकडी गणेश मंदीराचा विकास, वारकरी व ओबीसी भवन, महाज्योती संस्थेसाठी मौजा सिताबर्डी येथे ७ माळांचे प्रशासकीय इमार व १२ माळयांची प्रशिक्षण इमारत बांधकाम. वाठोडा येथे ३०० हॉस्पिटल बांधकाम. भरतवाडा व पुनापूर येथली वीटभट्टीधारकांच्या पुर्नवसनासाठी ५०० कोटींची तर ३५६ कोटींच्या शासकीय अनुदानातून विकास योजना राबविण्यात येणार आहे.
नासुप्रच्या मुख्यालयात सोमवारी पार पडलेल्या या सभेत नासुप्रचे सभापती तथा नामप्रविप्राचे आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी यांनी २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विश्वस्त आमदार मोहन मते, संदिप इटकेलवार, नगर रचना विभागाचे प्रभारी सहसंचालक प्रमोद गावंडे, नासुप्रचे महाव्यवस्थापक अविनाश कातडे, नासुप्रचे अधिक्षक अभियंता प्रशात भांडारकर, कार्यकारी अधिकारी अविनाश गंधे, नासुप्रचे मुख्यलेखा व वित्त अधिकारी विलीन खडसे, कार्यकारी अभियंता ललीत राऊत, शाखा अधिकारी राजेश काथवटे आदी उपस्थित होते.
जमा होणारा महसूल (कोटी )
शिल्लक जमा ९०२.५६
भांडवली जमा ४६६.०३
महसूली जमा १५३.२२
अग्रिम व ठेवी जमा ५८.६१
खर्च होणारा महसुल(कोटी )
भांडवली खर्च ६४५.०४
महसूली खर्च १५६.६६
अग्रिम व ठेवी ८१.११