गारपीट नुकसान भरपाईसाठी मिळाले ९ कोटी
By आनंद डेकाटे | Updated: May 5, 2023 16:15 IST2023-05-05T16:14:49+5:302023-05-05T16:15:24+5:30
Nagpur News मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी जिल्ह्याला ९ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा निधी लवकरच पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

गारपीट नुकसान भरपाईसाठी मिळाले ९ कोटी
आनंद डेकाटे
नागपूर : मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानापोटी जिल्ह्याला ९ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. हा निधी लवकरच पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे गहू, चना, संत्रा, मोसंबीसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. संप काळातही महसूल, कृषी विभागाच्या कर्चमाऱ्यांनी पंचनामे केले. प्राथमिक सर्वेक्षणात सात हजारांवर पिकांचे नुकसान झाल्याचा समोर आले. अंतिम अहवालात हा आकडा ४४४१ हेक्टर होता. दरम्यानच्या काळात शासनाने मदतीच्या रकमेत वाढ केली. खरीप हंगामात अतिवृष्टी व पुराचा फटका शेतकऱ्यांना बसला. काहीसे पीक हातात आले. परंतु भाव नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
रब्बीत चांगले पीक होण्याची अपेक्ष होती. परंतु अवकाळ पाऊस व गारपीटीने त्यावर पाणी फेरले. त्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. मार्च महिन्यात ४ हजारांवर हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मार्च महिन्यात झालेल्या नुकसानासाठी मदत देण्यासाठी १० एप्रिला शासनाने आदेश काढला. परंतु यात नागपूर जिल्ह्याचा समावेश नव्हता. याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. आता शासनाने नुकसानापोटी ९ कोटी ७ लाख ४५ हजार ७०० रुपयांची निधी मंजूर केला.
असा मिळणार निधी
तालुका - एकुण बाधित क्षेत्र - बाधित शेतकरी - मदत रक्कम
काटोल - १०३९ - १४४३ - २,२७,३९,५००
ना. ग्रामीण - १ - २ - ८५००
पारशिवनी - १२ - २१ - २,१५,०००
कळमेश्वर - २९९०.३५ - ३४८४ - ६,१०,९६,४७५
मौदा - ५०.१० - ८८ - ८६१६००
रामटेक - २४१.३५ - ११७- ३८,७९,८२५
सावनेर - १०७ - ११७ - १९, ४४, ८००