एमबीबीएसच्या ५०० जागांवर ८ ला निर्णय
By Admin | Updated: June 30, 2014 00:40 IST2014-06-30T00:40:18+5:302014-06-30T00:40:18+5:30
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या वाढविलेल्या राज्यातील ५०० जागा या वर्षी राखून ठेवल्या. या जागांना घेऊन ८ जुलैला निर्णय होणार आहे.

एमबीबीएसच्या ५०० जागांवर ८ ला निर्णय
नागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात एमबीबीएसच्या वाढविलेल्या राज्यातील ५०० जागा या वर्षी राखून ठेवल्या. या जागांना घेऊन ८ जुलैला निर्णय होणार आहे.
देशात एमबीबीएसच्या तीन हजार जागा वाढविण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता. प्रथम वर्ष एमबीबीएसची प्रवेशक्षमता ५० व १०० असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी ५० वाढीव जागा मिळाल्या होत्या. या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात २०६० जागांवरून २५६० जागांवर प्रवेश प्रक्रिया होणार होती. परंतु एमसीआयने ५०० जागा राखून ठेवल्याने जुन्याच जागांवर या वर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. वाढलेल्या जागा मिळविण्यासाठी दोन खासदारांसोबतच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने आपल्या प्रयत्नाला वेग आणला. यामुळे आता ८ जुलैला यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी ’लोकमत’ला सांगितले, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यात विशेष लक्ष घातले आहे. यामुळे लवकरच यावर निर्णय होणार आहे. एमसीआय ५०० जागांना मान्यता देण्याची दाट शक्यता आहे, असे झाल्यास याचा फायदा राज्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना होईल. (प्रतिनिधी)