शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

१४ मोठ्या ग्राम पंचायतींना ८.८१ कोटीचे विशेष अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:22 AM

जिल्ह्यातील १४ मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी ८.८१ कोटी रुपयाचे विशेष अनुदान शासनाने मंजूर केले असून त्यापैकी ९० लक्ष रुपये या ग्रामपंचायतींना तातडीने वितरित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकुही, हिंगणा, कामठी, सावनेर, उमरेड, नागपूर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील १४ मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी ८.८१ कोटी रुपयाचे विशेष अनुदान शासनाने मंजूर केले असून त्यापैकी ९० लक्ष रुपये या ग्रामपंचायतींना तातडीने वितरित करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीतून हे विशेष अनुदान देण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधीचे आदेश काढले आहेत.या निर्णयामुळे मोठ्या ग्रामपंचायतींना गावांमध्ये अधिक नागरी सुविधा नागरिकांना पुरविता येणार आहेत. शासनाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या मागणीच्या ९० टक्के निधी शासनातर्फे देण्यात येतो, तर १० टक्के निधी ग्रामपंचायतीला विकास कामांमध्ये टाकावा लागतो. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये कुही तालुक्यातील वेलतूर ग्रामपंचायतीने नागरी सुविधांसाठी ५ कोटींचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले होते. यापैकी ४.५ कोटींना मंजुरी मिळाली आहे. हिंगणा तालुक्यात डिगडोह ग्रामपंचायतीने ५ कोटींचे प्रस्ताव सादर केले होते. या ग्रामपंचायतीला ४.५ कोटी मंजूर करण्यात आले. कामठी तालुक्यात येरखेडा ग्रामपंचायतीची २० कोटींची मागणी होती. या ग्रामपंचायतीला १८ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. वडोदा ग्रामपंचायतीला ४.५ कोटी मंजूर करण्यात आले. बिडगाव ग्रामपंचायतीला ४.५ कोटी मंजूर करण्यात आले. भिलगाव ग्रामपंचायतीलाही ४.५ कोटी मंजूर करण्यात आले.सावनेर तालुक्यात पाटणसावंगी ग्रामपंचायतीलाही ४.५ कोटी मंजूर करण्यात आले. चिचोली ग्रामपंचायतीला ४.५ कोटी मंजूर करण्यात आले. उमरेड तालुक्यात सिर्सी ग्रामपंचायतीला ६७ लक्ष ५० हजार मंजूर करण्यात आले. वायगाव ग्रामपंचायतीला ४.५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. बेला ग्रामपंचातीलाही ४.५ कोटी मंजूर करण्यात आले. नागपूर तालुक्यात बहादुरा ग्रामपंचायतीला ४.५ कोटी, बेसा ग्रामपंचायतीला ४.५ कोटी आणि कोराडी ग्रामपंचायतीला ५० लाख ४० हजार रुपये नवीन कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. यापैकी काही रक्कम प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात येत आहे. या निधीतून सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, भूमिगत रस्ते, रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण, पेवर ब्लॉक ही कामे करण्यात येणार आहेत.या अनुदानातून घेण्यात येणारे काम संभाव्य सिंचन प्रकल्प, रस्ते, विशेष आर्थिक क्षेत्र या प्रकल्पाखाली जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अनधिकृत, वादग्रस्त जागेवर कामे करता येणार नाहीत. शासकीय विभागांच्या नियमांचे पालन कामे करताना करावे लागणार आहे. जि.प.च्या अधीन असलेल्या रस्त्यांसाठी जि.प.चे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

टॅग्स :Governmentसरकारfundsनिधीgram panchayatग्राम पंचायत