पूर्व विदर्भात ८४ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST2021-02-05T04:57:44+5:302021-02-05T04:57:44+5:30
नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून सोमवारी ४८३३१ लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य होते. त्यापैकी ३५७७२४ (८४ टक्के) लाभार्थ्यांना ...

पूर्व विदर्भात ८४ टक्के लसीकरण
नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून सोमवारी ४८३३१ लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य होते. त्यापैकी ३५७७२४ (८४ टक्के) लाभार्थ्यांना लस देण्यात आली. सर्वाधिक लसीकरण, १२० टक्के वर्धा जिल्ह्यात, तर सर्वांत कमी लसीकरण, ६१ टक्के नागपूर जिल्ह्यात झाले.
नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ६३.५१ टक्के प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक लसीकरण भंडारा जिल्ह्यात झाले होते. तर, सर्वांत कमी लसीकरण गडचिरोली जिल्ह्यात झाले. लसीकरणाच्या दसऱ्या दिवशी, १९ जानेवारी रोजी सहाही जिल्ह्यात कमी लसीकरण, ४९.३ टक्के झाले. यात गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत कमी, तर भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक झाले. २० जानेवारी रोजी ७५ टक्के लसीकरण झाले. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक, ९१ टक्के लसीकरण झाले. गडचिरोली जिल्ह्यात सर्वांत कमी, ४६ टक्के झाले. २२ जानेवारी रोजी ९२ टक्के लसीकरण झाले. यात सर्वाधिक लस वर्धा जिल्ह्यात तर सर्वांत कमी लस नागपूर जिल्ह्यात देण्यात आली. विशेष म्हणजे, सहा जिल्ह्यातील लसीकरण हे ८५ टक्क्यांवर गेले होते. २३ जानेवारी रोजी लक्ष्याच्या वर, १०२ टक्के लसीकरण झाले. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १४३ टक्के, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमी ७९ टक्के झाले.
-सहाही जिल्ह्यांत ६० टक्क्यांवर लसीकरण
२५ जानेवारी रोजी सहाही जिल्ह्यांत ६० टक्क्यांवर लसीकरण झाले. भंडाऱ्यात ११३ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ६५ टक्के, गडचिरोली जिल्ह्यात ९२ टक्के, गोंदिया जिल्ह्यात ८८ टक्के, नागपूर जिल्ह्यात ६१ टक्के, तर वर्धा जिल्ह्यात १२० टक्के लसीकरण झाले. राज्यात लसीकरणाचा दर ७४ टक्के होता.