वर्षभरात एसटीचे ८१ अपघात ; नागपूर विभागातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:21 AM2020-02-22T11:21:51+5:302020-02-22T11:22:15+5:30

नागपूर विभागातील वर्षभरात झालेल्या अपघातांवर नजर टाकली असता वर्षभरात नागपूर विभागात ८१ अपघात घडल्याची धक्कादायक माहिती आहे

81 ST accidents during the year; Status of Nagpur Division | वर्षभरात एसटीचे ८१ अपघात ; नागपूर विभागातील स्थिती

वर्षभरात एसटीचे ८१ अपघात ; नागपूर विभागातील स्थिती

Next
ठळक मुद्दे७ जणांचा मृत्यू, ४६ गंभीर अपघात

दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असल्यामुळे प्रवासी एसटी बसने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु एसटीच्या नागपूर विभागातील वर्षभरात झालेल्या अपघातांवर नजर टाकली असता वर्षभरात नागपूर विभागात ८१ अपघात घडल्याची धक्कादायक माहिती आहे. यात ४६ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले असून २८ किरकोळ अपघाताची नोंद एसटी महामंडळाने केली आहे.
अपघातावर एसटी महामंडळाच्या उपाययोजना
अपघात टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने प्रत्येक चालकाला रिफ्रेशर कोर्सद्वारे मार्गदर्शन करण्यात येते. चालकांची भरती प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना ४८ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर चालकांच्या तीन परीक्षा घेण्यात येतात. ड्यूटीवर रुजू झाल्यानंतरही सुरक्षित वाहन चालविण्यासाठी चालकांना ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येते. एसटी महामंडळात चालकांना सतत प्रशिक्षण देण्यात येते.

दुचाकीचालकांनी काळजी घ्यावी
‘पूर्वीपेक्षा एसटी बसेसच्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. सर्वाधिक अपघात एसटी बस आणि दुचाकीचे होतात. एसटीची बस ही दुचाकीच्या तुलनेत मोठी असल्यामुळे दुचाकीचालकांनीसुद्धा काळजी घेऊन बसला जाऊ द्यावे. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होईल.’
-शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक,
एसटी महामंडळ, नियंत्रण समिती ३, मुंबई

Web Title: 81 ST accidents during the year; Status of Nagpur Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात