लोकमत सखी मंच व युनिक स्लिम पॉईंट अॅण्ड ब्युटी क्लिनीकचे आयोजननागपूर : लोकमत सखी मंच व युनिक स्लिम पॉईंट अॅण्ड ब्युटी क्लिनीकद्वारे ‘सजना है मुझे’ या विषयावर सेमिनारचे आयोजन डॉ. देशपांडे सभागृहात करण्यात आले होते. यात मेकअप संदर्भात अॅडव्हान्स ट्रीटमेंट व करिअर संदर्भात मार्गदर्शन आणि विविध प्रकारच्या मेकअपचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. रिचा जैन यांनी स्वत:चा परिचय देत, ब्युटी पार्लरच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माहिती दिली. ‘सजना है मुझे’ या विषयावर लघुनाट्यही सादर करण्यात आले. या नाटकात ब्युटी क्लिनिकमध्ये असलेल्या स्लिमिंग ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट, स्किन ट्रीटमेंट, हाईट ट्रीटमेंट, अॅडव्हान्स ब्युटी हेअर कोर्स आदी विषय होते. डॉ. रिचा जैन म्हणाल्या की, ब्युटी व हेअर फिल्डमध्ये महिलांनी करियर करताना, सर्वप्रथम बेसिक कोर्ससाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत आपली नोंदणी करावी. यात केवळ १५०० रुपयात ३० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणात असिस्टंट ब्युटीशियन, असिस्टंट हेअर स्टाईलिश नावाने दोन बेसिक कोर्स आहेत. हे दोन्ही कोर्स अकादमी आॅफ युनिक इंटरनॅशनल येथे शिकविण्यात येतात. कोर्सनंतर नोंदणीकृत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येते. सर्व उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना १५०० रुपयांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. यासाठी ज्यांना आपली नावे नोंदवायची आहे, त्यांनी ८ आॅगस्टपर्यंत आपले नामांकन लोकमत सखी मंचच्या कार्यालयात अथवा युनिक स्लिम पॉईंट अॅण्ड ब्युटी क्लिनिक, गांधीबाग व वर्धा रोडवरील ब्रॅँच आॅफिसमध्ये तसेच युनिक हाईट बिल्डिंग सीताबर्डी येथे करू शकतात. कार्यक्रमात अॅडव्हान्स मशीनद्वारे स्किन ट्रीटमेंट, रेडिओ लेजरद्वारे अॅडव्हान्स स्किन ट्रीटमेंट, ग्रीन फेस स्पा, आदीचे सादरीकरण करण्यात आले. टेनक्लिअर ट्रीटमेंटद्वारे त्वचेत होणारे बदल दाखविण्यात आले. यानंतर युनिक स्लिम पॉईंट ब्युटी क्लिनिकच्या स्टाफद्वारे ब्राईडल मेकअप व वेस्टर्न मेकअप करून दाखविले. संचालन सोनल धाबेकर व प्राची सोनटक्के यांनी केले. ममता मून, रजनी, सोनल, इमरान शेख, रिया, सुरेश भरत आदींनी सहकार्य केले. शेवटी डॉ. रिचा जैन द्वारे लकी ड्रॉ काढून तीन महिलांना १००० रुपयांचे गिफ्ट कुपन दिले. लोकमत सखी मंचतर्फे नेहा जोशी यांनी संपूर्ण सहकार्य केले. (प्रतिनिधी)
८०० सखी शिकल्या ब्युटी ट्रीटमेंट
By admin | Updated: August 6, 2015 02:48 IST