शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"कंगनाचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले"; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:06 IST

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. 

नागपूर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचे घर तोडण्यासाठी वकिलाला 80 लाख दिले. उद्योजकांकडे टक्केवारी मागितली, असा घणाघात शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या घरावर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने वकिलाला तब्बल 80 लाख रुपये दिले होते, असा आरोप एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केला आहे. यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्यांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, टोमणेसेनेच्या नव्या प्रवक्त्यांनी जिजाऊची उपमा देण्याचे काम केले. बाळासाहेब आम्हाला म्हणायचे तुम्ही लढा मी तुमच्या पाठिशी आहे, पण हे तुम लढो हम कपडे संभालते अशी भूमिका घेत होते. पण, कंगणाचे घर पाडण्यासाठी मनपाचे 80 लाख रुपये वकीलाला दिले असा, आरोप एकनाथ शिंदेंनी केला आहे. महाविकास आघाडी विरोधात बातम्या लावणाऱ्या पत्रकारांना त्रास दिला गेला असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, नोव्हेंबर 2020 मध्ये कंगना राणौत हिच्या मुंबईतील पाली हिल्स येथील घरावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. ते घर तिचे ऑफिसदेखील होते. ती तिथूनच आपली कामे पाहत असे. मात्र कंगना राणौतच्या या घराचा काही भाग अनधिकृत असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने तिच्या घराच्या काही भागावर बुलडोजर चालवला होता. आपल्याला या प्रकरणाची कोणतीही कल्पना नसल्याचे तसेच हे बांधकाम अधिकृत असल्याचे कंगना राणौतने म्हटले होते. मात्र अधिकाऱ्यांनी स्वतः हजर राहून तिच्या घरावर कारवाई केली होती. यानंतर कंगना राणौत देखील आफल्या घरावर कारवाई केल्याप्रकरणी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला सोशल मीडियाद्वारे धारेवर धरले होते. 

एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरेंवर घणाघात विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी या भाषणामध्ये आपल्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा, म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलून टाकला", अशा शब्दात उद्धव ठाकरेंना टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लोबोल केला. एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षात तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला. विदर्भातील शेतकरी चांगल्या  गाडीतून फिरला पाहिजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यांत विमानतळ सुरु करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणून हिणवले. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतEknath Shindeएकनाथ शिंदेnagpurनागपूरPoliticsराजकारणMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका