शेतातून ७७ पाेती धान लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:35+5:302020-12-26T04:08:35+5:30

नगरधन : चाेरट्याने शेतातील धानाच्या ९३ पाेत्यांपैकी ७७ पाेती धान चाेरून नेला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बनपुरी ...

77 paise of paddy lampas from the field | शेतातून ७७ पाेती धान लंपास

शेतातून ७७ पाेती धान लंपास

नगरधन : चाेरट्याने शेतातील धानाच्या ९३ पाेत्यांपैकी ७७ पाेती धान चाेरून नेला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बनपुरी शिवारात बुधवारी (दि. २३) मध्यरात्री घडली.

नत्थू हरिश्चंद्र भाेंदे यांची बनपुरी (ता. रामटेक) शिवारात शेती आहे. त्यांनी पाच एकरातील धानाच्या पिकाची मळणी करून धानाची ९३ पाेती शेतातच ठेवली हाेती. यातील ७७ पाेती शिवलेली हाेती तर १६ पाेती उघडीच हाेती. दरम्यान, मध्यरात्री शेतात कुणीही नसताना चाेरट्याने शिवलेली धानाची ७७ पाेती चाेरून नेली. त्या धानाची एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपये असून, चाेरट्याने पाेती नेण्यासाठी ट्रॅक्टर व अन्य एका वाहनाचा वापर केल्याची माहिती नत्थू भाेंदे यांनी पाेलिसांना दिली. शेतात या वाहनांच्या चाकांचे निशाण असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: 77 paise of paddy lampas from the field