शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विना फिटनेस धावत आहेत ७६२ स्कूल बसेस, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By सुमेध वाघमार | Updated: July 7, 2023 17:59 IST

स्कूलबस सुरक्षितता समितीची बैठक : सोमवारपासून आरटीओ व पोलिसांची संयुक्त तपासणी मोहिम

सुमेध वाघमारे 

नागपूर : शहर व ग्रामीण भागातील ३,७५७ स्कूल बस व व्हॅनमधील २,९९५ वाहनांनी फिटनेस सर्टीफिकेट म्हणजे योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण के ले आहे. उर्वरीत ७६२ वाहने अद्यापही विना ‘फिटनेस’ रस्त्यावर धावत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. अशा वाहनावर कारवाई करण्यासाठी सोमवारपासून आरटीओ व पोलीस विभागाची संयुक्त मोहिम राबविण्याचा सूचना शुक्रवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिल्या. 

पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी स्कूलबस सुरक्षितता समितीची बैठक पार पडली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, पोलीस उपायुक्त (वाहतूक) चेतना तिडकेयांच्यासह पोलीस विभागातील वरीष्ठ अधिकारी, तिन्ही आरटीओ कार्यालयातील अधिकारी व विविध शाळेतील मुख्यध्यापक उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षित वाहतुकीचा आढावा घेतला. 

- आता सुटीच्या दिवशीही योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण

 ज्या स्कूल व्हॅन किंवा स्कूल बसला योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याकरिता ऑनलाईन तारीख व वेळ मिळत नसेल अशा वाहनांसाठी आता शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

- क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसविल्यास कारवाई

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ चे १०६ च्या तरतुदीनुसार दिलेल्या आसन क्षमतेप्रमाणे विद्यार्थ्यांची न केल्यास, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविल्यास  ऑटोरिक्षा, स्कुल व्हॅन, स्कुल बसवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ व महाराष्ट्र मोटार वाहन (स्कुल बस करीता विनियम) २०११ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले. 

- पालकांनीही वाहनांचे कागदपत्र तपासावे

 ज्या स्कूल बस किंवा स्कूल वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक होते, अशा वाहनांचे कागदपत्र वैध असल्याची खात्री पालकांनी करावी, अशा सूचाही देण्यात आल्या.

- योग्यता प्रमाणपत्र वैध करुन घ्या

 १० जुलैपासून परिवहन विभाग व पोलसी विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यापूर्वी आपल्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र व सर्व कागदपत्र वैध करून घ्या, अन्यथा मोटार वाहन कायद्यांतर्गंत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकStudentविद्यार्थीSchoolशाळाnagpurनागपूरroad safetyरस्ते सुरक्षा